Total Dhamaal: मुंगडा गाण्यावर सोनाक्षी सिन्हा हिचा हेलन टच अंदाज पाहून चाहत्यांना धक्का (व्हिडिओ)
Sonakshi Sinha reinvents Helen classic | (Photo Credit: Representative and Edited Images)

Total Dhamaal song Mungda: 'टोटल धमाल (Total Dhamaal)'चित्रपटातील नवे गाणे 'मूंगड़ा (Mungda)' नुकतेच रिलीज झाले. या गाण्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)आपल्या खास अंदाजात दिसत आहे. सोनाक्षीचे हे रुप पाहून तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. कारण, या अंदाजात तिच्या चाहत्यांनी तिला कधीच पाहिले नाही. सोनाक्षीचा मूंगडा गाण्यावरचा डान्स म्हणजे ओरिजनल मूंगडा गाण्याचा रिमेक आहे. ओरिजनल मूंगडा गाण्यावर हेलन (Helen) हिने डान्स केला होता आणि ते गाणे त्या काळापासून आजपर्यंत हिटच राहिले आहे. या गाण्यातही सोनाक्षीने आपल्या परिने जबरदस्त परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ओरिजनल गाण्यातील हेलनचा परफॉर्मन्स सोनाक्षीपेक्षा दमदार वाटतो.

टोटल धमालच्या मूंगडा गाण्यावर (Total Dhamaal song Mungda) प्रथमच सोनाक्षीचा नवा अंदाज पाहायला मिळत आहे. दरम्यान, या गाण्यात अभिनेता अजय देवगणही (Ajay Devgn) दिसतो. कूकी गुलाटी या गाण्याचा दिग्दर्शक आहे. हे गाणे युट्यूबवर रिलीज झाले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गाणे रिलीज होताच प्रसारमाध्यमांतून बातम्यांचा विषय ठरले आहे. हे गाणे आणि ते चित्रीत होताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगताना सोनाक्षी सिन्हा म्हणते, माझ्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव आहे. मला हेलन आंटीच्या गाण्यावर परफॉर्मन्स करण्याची संधी मिळाली. मी 'हॅप्पी भाग जाएगी'च्या 'चिन चिन चू' गाण्याची भाग होती आता मी 'मूंगडा' गाण्यावर डान्स करते आहे. जून्या गाण्यांना री-पॅकेज करुन नव्या पीढिला सादर करता येते ही आजच्या काळातील एक चांगली गोष्ट आहे. मला आनंद आहे की, मलाही याचा एक भाग बनता आले.

या गाण्यावर डान्स करताना तुला हेलन यांच्या डान्ससोबत तुझ्या डान्सची तुलना होईल असा दबाव होता काय असे प्रसारमाध्यमांनी विचारताच सोनाक्षी सांगते, हेलन अंटीची सर कोणालाच येणे कठीण आहे. त्यांची कॉपी करणेही मूर्खपणा आहे. त्यांचा डान्स पूर्णपणे एक नंबर आहे. त्यामुळे माझ्या गाण्याला ओरिजनल गाण्याशी जुळविण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. तसे न करण्यावर आम्ही ठाम होतो. (हेही वाचा, धक्कादायक : Amazon वरून सोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन, मिळाला लोखंडी नळीचा तुकडा)

दरम्यान, अजय देवगण याच्यासोबत काम करताना आलेल्या अनुभवाबद्दल सोनाक्षी सांगते, तो एक चांगला अभिनेता आहे. त्याला डान्स जराही आवडत नाही. त्यामुळे मी त्याला या गोष्टीवरुन चांगलीच चिडवत असे. टोटल धमाल हा चित्रपट इंद्र कुमार यांनी दिग्दर्शित केला असून, हा चित्रपट येत्या 22 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.