सोनाक्षी सिन्हा (Photo Credit: Instagram @aslisona)

सध्याच्या या डिजिटल युगात गोष्टी खरेदी करण्यासाठी प्रत्यक्ष बाजारात जाण्याऐवजी ऑनलाईन शॉपिंगला जनता प्राधान्य देताना दिसून येते. बाजारात जाणे, हव्या त्या वस्तुंसाठी सतरा दुकाने फिरणे, किमतीमध्ये भाव करणे यापेक्षा ढीगाण्या पर्यायामधून हवी ती गोष्ट निवडा आणि ऑर्डर करा, दोन दिवसांत डिलिव्हरी. या इतक्या सोप्या प्रक्रियेचा मोह बॉलीवूड कलाकारांना झाला नाही तर नवल. सेलिब्रिटी लोकांची लाइफस्टाइल हा फार मोठा नवलाच आणि चर्चेचा विषय असतो. हे लोक वापरत असलेल्या गोष्टी कुठून खरेदी करतात याची जनतेला फार उत्सुकता असते. मात्र सेलेब्जसुधा ऑनलाईन शॉपिंग करतात. होय, नुकतेच सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ने अॅमेझॉन (Amazon) वरून हेडफोन्स मागवले होते, मात्र इतक्या मोठ्या सेलेब्रिटीला अॅमेझॉनने चक्क लोखंडी नळीचा तुकडा पाठवला.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ऑनलाईन फ्रॉडची शिकार ठरली आहे. नुकतेच सोनाक्षीने Bose कंपनीचा हेडफोन मागवला होता. डिलिव्हरीनंतर पार्सल उघडून पहिले तर त्यात लोखंडी नळीचा तुकडा दिसला. त्यानंतर चिडलेल्या सोनाक्षीने लगेच याबाबत ट्विट करत नाराजी व्यक्त केली. शिवाय यासंदर्भात अ‍ॅमेझॉनकडे तक्रारही केली. पण अ‍ॅमेझॉनच्या ग्राहक सेवेने कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही असे सोनाक्षीचे म्हणणे आहे. (हेही वाचा : जगातील सर्वात उंच इमारतीवर लग्न करण्यासाठी प्रियंका आणि निकला तिसऱ्या लग्नाचे निमंत्रण)

याआधीही अशा ऑनलाईन फ्रॉडच्या अनेक घटना अॅमेझॉनकडून घडलेल्या आहेत. दिल्लीच्या विक्रमजीतने 42 हजाराचा मोबाईल फोन ऑर्डर केला होता. मात्र अॅमेझॉनने त्याला घडी साबणाची वडी पाठवली होती.