
जगभरातील किंग खानच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे ती शाहरुखचा (Shahrukh Khan) आगामी चित्रपट 'पठाण'ची (Pathan).... या चित्रपटातील शाहरुखचा लूक, त्याची भूमिका या सर्वांबद्दल जाणून घ्यायची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेला शाहरुखचा हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याचीच सर्वजण वाट पाहत आहे. चाहत्यांची ही उत्सुकता अजून ताणून धरण्यासाठी चित्रपटाच्या सेटवरुन एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा दुबईतील शूटिंग सेटवरील व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये किंग खान अॅक्शन सीनची तयारी करताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये शाहरुख खान एका गाडीवर उभा आहे. त्याच्याबरोबर या सिनेमाची संपूर्ण टीम त्याच्या आजूबाजूला उभा आहे. हे क्रू मेंबर्स त्याच्या अॅक्शन सीनची तयारी करत आहे.हेदेखील वाचा- Toofaan Official Teaser: फरहान अख्तर याच्या 'तुफान' सिनेमचा टीझर आऊट (Watch Video)
पाहा व्हिडिओ:
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये शाहरुख काळ्या रंगाचे टी शर्ट, जॅकेट आणि हिरव्या रंगाची पँट घातली आहे. यशराज फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सिद्धार्थ आनंद करत आहेत. शाहरूखचा 2018 साली आलेल्या 'जिरो' चित्रपटाच्या बरोबर 2 वर्षानंतर शाहरुख 'पठान' या चित्रपटातून कमबॅक करत आहे. पठान चित्रपटात दिपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम लीड रोलमध्ये आहे. चित्रपटात दीपिका आणि शाहरुख रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. तर ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया या एजंसीची प्रमुख दाखवली आहे. तर जॉन अब्राहम या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसेल.
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान सध्या दुबईत आगामी सिनेमा पठाण चे शूटिंग करत आहे. या सिनेमाच्या सेटवरुन फोटोज आणि व्हिडिओज लीक झाले आहेत. यात शाहरुख खान चालत्या गाडीच्या छतावर बसलेला दिसत आहेत. यावरुन ते अॅक्शन सीनसाठी शूट करत असल्याचे दिसून येते. लीक झालेले फोटोज इंटरनेटवर जोरदार व्हायरल झाले असून चाहत्यांची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे.