Toofaan Official Teaser: फरहान अख्तर याच्या 'तुफान' सिनेमचा टीझर आऊट (Watch Video)
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याचा आगामी सिनेमा फरहान अख्तर याच्या तुफान सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यात फरहान चा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. सिनेमात फरहान एका बॉक्सरची भूमिका साकारत असून त्यात तो अगदी साजेसा दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) याचा आगामी सिनेमा 'तुफान' चा (Toofaan) टीझर (Teaser) प्रदर्शित झाला आहे. यात फरहान चा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. सिनेमात फरहान एका बॉक्सरची भूमिका साकारत असून त्यात तो अगदी साजेसा दिसत आहे. गुंडागर्दी करण्यापासून राष्ट्रीय स्तरावर नाव कमावणारा एक बॉक्सर असा सिनेमाच्या कथेचा प्रवास आहे. दरम्यान, या सिनेमात फरहान अख्तर शिवाय मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) आणि परेश रावल (Paresh Rawal) यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
या टीझरची सुरुवात एका बॉक्सिंग रिंग पासून होते. त्यानंतर अजू भाई ते अझिज अली बॉक्सर बनण्यासाठी फरहान घेत असलेली मेहनत टीझरमध्ये पाहायला मिळते. टीझर रिलीज होताच फरहानच्या चाहत्यांना आता ट्रेलरचे वेध लागले आहेत. (फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लवकरच अडकणार लग्नबंधनात?; जाणून घ्या Javed Akhtar यांची प्रतिक्रिया)
पहा टीझर:
'रंग दे बसंती', 'भाग मिल्खा भाग' या सिनेमाचे दिग्दर्शन ओमप्रकाश मेहरा यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमासाठी फराहन अख्तरने खूप मेहनत घेतली असून त्याची झलक आपल्याला टीझरमधून दिसत आहे.
लॉकडाऊनचे नियम शिथिल होऊ लागल्यापासून पुन्हा एकदा चित्रपट सिनेमागृहांमध्ये रिलीज होऊ लागले आहेत. मात्र तुफान सिनेमा त्यास अपवाद ठरत आहे. 21 मे रोजी अॅमेझॉन प्राईमवर हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2021 02:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

