Bollywood Drug Case: बॉलिवूड मधील ड्रग्ज माफियांबद्दल तपास करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांचे NCB कडून निलंबन, विभागीय चौकशी करण्याचे आदेश
एनसीबी (Photo Credits: Twitter)

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने बॉलिवूड ड्रग्ज माफिया बद्दल करण्यात येणाऱ्या तपासात दोन आरोपींना दिलासा देत कथित संदिग्ध भुमिकेसाठी आपल्या मुंबई झोनल युनिट मधील दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. ही माहिती अधिकृत सुत्रांकडून गुरुवारी देण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने निनावीपणाचा विरोध करत IANS यांना म्हटले आहे की, दोन्ही अधिकाऱ्यांबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. तपास करणाऱ्या दोन्ही अधिकाऱ्यांवर हर्ष लिंबाचिया आणि करिश्मा प्रकाश क्रमश: जामिन आणि अंतरिम जामिन मिळाल्यानंतर ही कारवाई केली आहे.(Drugs Case: Showik Chakraborty चा जामीन Special NDPS Court कडून मंजूर; 2 महिन्यांनंतर सुटका)

लिंबाचिया हाय प्रोफाइळ टेलिव्हिजन पर्सनालिटी भारती सिंह हिचा पती आहे. तर करिश्मा प्रकाश बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिची मॅनेजर आहे. लिंबाचिया आणि करिश्मा प्रकाश यांच्या घरावर गेल्या महिन्यात एसनसीबीच्या पथकाने छापेमारी केली होती. तेथे एनसबीच्या पथकाला काही प्रमाणात ड्रग्जचा साठा आढळून आल्याने त्यांनी तो जप्त केला होता.(Kangana Ranaut On Mumbai High Court Decision: मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर कंगना रनौत आनंद व्यक्त करत म्हणाली 'लोकतंत्रचा विजय झाला', Watch Video)

दरम्यान, भारती आणि हर्ष या दोघांना या प्रकरणी अटक ही करण्यात आली होती. मात्र या दोघांना जामिन मिळाला. तर करिश्मा प्रकाश हिला एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी पाठवण्यात आलेल्या समन्सला उत्तर दिले नाही. पण तिला सुद्धा नंतर अंतरिम जामिन दिला गेला. या दोन्ही घटनेत दोन्ही आईओ कथित भुमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत की, एनसीबीने हे पाऊल झोनल निर्देशक समीर वानखेडे द्वारे देण्यात आलेल्या आदेशावरील एका अंतरिम तपासाच्या प्राथमिक रिपोर्टवर उचलले आहे. निलंबन प्रकरणात पूर्णपणे विभागीय चौकशी ही केली जाणार आहे. ज्यामध्ये वकिलांसहकाही अन्य लोकांचा समावेश असल्याचे ही समोर येण्याची शक्यता आहे.