Drugs Case: Showik Chakraborty चा जामीन Special NDPS Court कडून मंजूर; 2 महिन्यांनंतर सुटका

ड्रग्ज कनेक्शनच्या दृष्टीने एनसीबीने 24 सप्टेंबर दिवशी एनसीबीने कारवाई करत 24 वर्षीय शौविकला अटक केली होती.

Drugs Case: Showik Chakraborty चा जामीन Special NDPS Court  कडून मंजूर; 2 महिन्यांनंतर सुटका
Showik, Rhea Chakraborty (Photo Credits: File Image)

अभिनेत्री Rhea Chakraborty चा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) आज अखेर जामीन मंजूर झाला आहे. Special NDPS Court ने आज (2 डिसेंबर) शौविक च्या जामिनावर सुनावणी घेत त्याला जामीन दिला आहे. शौविक मागील 2 महिन्यांपासून कारागृहात आहे. त्याला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर ड्रग्सच्या अनुषंगाने तपास करताना Narcotics Control Bureau ने शौविक सह काही ड्रग्स पेडलर्सना ताब्यात घेत अटक केली होती. यामध्ये एनसीबीच्या रडारवर अनेक बडे बॉलिवूड कलाकार होते.

दरम्यान शौविकच्या पूर्वी 7 ऑक्टोबर 2020 दिवशी अभिनेत्री रियाला जामीन मंजूर झाला आहे. मात्र तिच्या भारताबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शौविकनेही मुंबई उच्च न्यायालय, मुंबई सत्र न्यायालयाने वारंवार जामीनासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्याला जामीन नामंजूर करण्यात आला होता. आज अखेर शौविकची सुटका करण्यात आली आहे. 50  हजारांंच्या जात मुचलक्यावर ही सुटका करण्यात आली आहे. त्याला पासपोर्ट सादर करावा लागणार  आहे. Rhea Chakraborty Bail: 'रिया सुटली, भाजपा ची पाटी फुटली!' , पाहा कोण म्हणतंय असं.  

ANI Tweet

अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून दिवशी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांपासून ते अगदी सीबीआय पर्यंत चौकशीचा ससेमिरा सुरू झाला होता. यामध्ये ड्रग्ज कनेक्शनच्या दृष्टीने एनसीबीने 24 सप्टेंबर दिवशी एनसीबीने कारवाई करत 24 वर्षीय शौविकला अटक केली होती.

(The above story first appeared on LatestLY on Dec 02, 2020 03:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).