Rhea Chakraborty | (Photo Credits: Facebook)

अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) सशर्थ जामीन (Rhea Chakraborty Gets Bail) मंजूर केला. त्यामुळे तब्बल 28 दिवसानंतर ती कारागृहाबाहेर आली. रिया चक्रवर्ती हिला सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात (Singh Rajput Suicide Case) अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) 8 सप्टेंबर या दिवशी अटक केली होती. दरम्यान, रिया चक्रवर्ती हिला जामीन मिळाल्यानंतर काँग्रेसने मात्र भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी “रिया सुटली, भाजपाची पाटी फुटली” असं म्हणत खोचक ट्विट करुन टोला लगावला आहे.

रिया सुटली, भाजपाची पाटी फुटली

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्ती हिचे नाव आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने अनेक आरोप केले होते. यात सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला जावा अशीही मागणी केली जात होती. या सर्व प्रकारावर “रिया सुटली, भाजपाची पाटी फुटली” असे म्हणत काँग्रेसच्या सचीन सावंत यांनी भाजपला टोला लगावला आहे. (हेही वाचा, Rhea Chakraborty Bail Update: रिया चक्रवर्ती, दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा ला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर)

रियाला जामीन, मात्र अनेक अटी लागू

रिया चक्रवर्ती हिला जामीन देताना न्यायालयाने अनेक अटी घातल्या आहेत. त्यानुसार रिया चक्रवर्ती हिचा पासपोर्ट जमा करुन घेण्यात आला आहे. त्यामुळे रियाला देश सोडता येणार नाही. त्यासोबतच तिला मुंबई शहराबाहेर जाण्यास, अथवा प्रवास करण्यास मनाई आहे. रियाला 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, कारागृहातून बाहेर गेल्यानंतर रियाने दर 10 दिवसांनी पोलिसात हजर राहून हजरी नोंदवावी. न्यायालयाच्या परवानगीशिवाय रियाला परदेश प्रवास करता येणार नाही. तिला मुंबई बाहेर जायचे असले तरीही तपास अधिकाऱ्याला कळवणं आवश्यक आहे, असेही रियाला जामीन देताना न्यायालयाने म्हटले आहे.

रियाच्या भावाचा जामीन फेटाळला

दरम्यना, रिया चक्रवर्ती हिच्यासोबतच सुशांत सिंह राजपूत यांचे कर्मचारी सॅम्यू्ल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, रियाचा भाऊ शोविक याला मात्र जामीन मिळू शकला नाही. शोविक याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. शविक याला रिया चक्रवर्ती हिच्यासोबतच अटक करण्यात आली होती. दरम्यान, अब्दुल बसित याचाही जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.

रियाच्या वकिलांकडून निर्णयाचे स्वागत

सतीश माने शिंदे यांनी रियाचे वकीलपत्र घेतले आहे. रियाला जामीन मिळाल्यानंतर सतीश माने शिंदे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केलेआहे. आम्ही सादर केलेले पुरावे न्यायलयाला मान्य आहेत. अखेर सत्याचा विजय झाला. रियाची अटक तिला देण्यात आलेली कोठडी ही कायद्याच्या पलीकडे होती. आता तरी ईडी आणि एनसीबीने तिचा पाटलाग करणे थांबवायला हवे, अशी प्रतिक्रिया अॅड. सतीश माने शिंदे यांनी व्यक्त केली आहे.