Kangana Ranaut (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने (BMC) 9 सप्टेंबर रोजी कारवाई करत ऑफिसची तोडफोड केली होती. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर कंगना ने शूटिंग सेटवरुन आपला एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. ज्यात तिने 'हा लोकतंत्रचा विजय आहे' असे सांगत आपला आनंद व्यक्त केला. तिचे आधीपासून हेच म्हणणे होते की ही कारवाई बेकायदेशीर होती. कोर्टाने दिलेल्या निर्णयात असे म्हटले आहे की, "आम्ही सर्व फोटोज पाहिले, बांधकामाची पाहाणी केली. यावरुन असे प्रतित होते की, येथे कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम नव्हते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने उचलेले पाऊल बेकायदेशीर होते." तसंच कंगना रनौत सरकारविरुद्ध सोशल मीडियावर करत असलेल्या पोस्टवरुन कोर्टाने तिला समज दिली आहे.

यावर कंगना शूटिंग सेटवरुन एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात ती म्हणाली की 'जेव्हा एखादा व्यक्ती सरकारविरोधात उभा राहतो आणि जिंकतो, तेव्हा तो विजय त्या व्यक्तिचा नसतो तर लोकतंत्रचा असतो. त्यामुळे माझा हा विजय लोकतंत्रचा विजय आहे. मी तुम्हा सर्वांचे आभार मानते ज्यांनी मला एवढी हिंमत दिली आणि त्या लोकांचे धन्यवाद मानते ज्यांनी माझ्या तुटलेल्या स्वप्नावर हसले. तुमची खलनायकाची भूमिका साकारण्यामागे एकच कारण आहे की, मी हिरोची भूमिका साकारू शकू.'हेदेखील वाचा- Kangana Ranaut Property Demolition Case: आम्ही जे काही केले ते नियमांप्रमाणेच- महापौर किशोरी पेडणेकर

BMC ने 7 आणि 9 सप्टेंबर रोजी कंगना रनौत हिला जारी केलेल्या नोटीसा खारीज करत मुंबई उच्च न्यायालयाने कंगना रनौत हिच्या घरावर केलेली तोडक कारवाई बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे कंगनच्या प्रॉपर्टीच्या झालेल्या नुकसानाची पाहाणी करण्यासाठी अधिकारी नेमण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत. या अधिकाऱ्याने कोर्टाला एक रिपोर्ट सुपूर्त करणे अपेक्षित आहे. त्या रिपोर्टची पाहणी करुन कंगना रनौत हिला नुकसान भरपाई देण्याचे आदेश जारी करण्यात येतील. तसंच कोर्टाने कंगना रनौतला सरकार आणि इतर व्यक्तींविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त विधान करण्याबाबत समज दिली आहे.

सध्या कंगना थलायवी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे तिने आपला हा आनंद या शूटिंगच्या सेटवरुन आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.