Bollywood Drugs Case: बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने (NCB) नुकत्याच अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याला पुन्हा एकदा समन्स पाठवले असून चौकशीसाठी बोलावले होते. यावर अर्जुनने आपल्या वकिलांच्या माध्यमातून एनसीबीने 22 तासांची मुदत मागितली होती. त्याचवेळी मीडियात अशा बातम्या चावल्या जात होत्या की, एनसीबीने समन्स पाठवल्यानंतर अर्जुन रामपालने देश सोडला असून लंडन मध्ये पोहचला आहे.(Bollywood Drugs Case: NCB ने समन्स बजावल्यानंतर Karan Johar ट्रोल; पहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया)
अर्जुन याने अशा पद्धतीच्या बातम्या पाहिल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. त्याने या रिपोर्ट्सचे खंडन केले असून मीडियाला खडे बोल सुनावले आहेत. अर्जुनने सोशल मीडियात ट्विट करत असे म्हटले आहे की, या देशातच आहे. माझा चित्रपट नेल पॉलिशचे प्रचार करत आहे. मला असे वाटते की काही न्यूज चॅनल ट्रॅव्हल एजेंट बनले आहेत. ही खोटी बातमी आहे.(Bollywood Drug Case: कंगना रनौत हिची ड्रग्स प्रकरणी चौकशी का झाली नाही? काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा सवाल)
Tweet:
Very much in the country, in fact just doing promotions for #nailpolish I guess some news channels have become travel agents.. lol #FakeNews
— arjun rampal (@rampalarjun) December 19, 2020
दरम्यान, ड्रग्ज प्रकरणी गेल्या महिन्यात अर्जुन रामपाल आणि गर्लफ्रेंड ग्रॅब्रिएल डेमेट्रिएड्स यांची ड्रग्ज संबंधित चौकशी केली होती. तर कॉमिडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया या दोघांना अटक केली होती. भारती आणि हर्षने ड्रग्ज सेवन केल्याचे एनसीबी समोर स्विकार केले होते.