Bollywood Drugs Case: NCB ने समन्स बजावल्यानंतर Karan Johar ट्रोल; पहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
Karan Johar (Photo Credit-Twitter)

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याला नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (Narcotics Control Bureau) कडून समन्स बजावण्यात आला आहे. दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणाचा खोलवर तपास सुरु झाला. त्यात अनेक मोठी नावे समोर आल्यानंतर आता करण जोहर NCB च्या रडारावर आहे. यावर नेटकऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांनी या प्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Karan Johar Issued Notice By NCB: ड्रग्ज प्रकरणात करण जोहरच्या घरी झालेली पार्टी वादाच्या भोवऱ्यात; सर्व पुरावे सादर करण्याचा आदेश- Reports)

2019 मध्ये करण जोहर ने त्याच्या घरी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत ड्रग्सचे सेवन केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीकडून समन्स जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया:

कॉफी विथ एनसीबी:

फादर ऑफ नेपोटिज्म:

मिठाई वाटा:

अखेर तो दिवस आलाच!

करण जोहरच्या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनजिंदर सिंह सिरसा यांनी या प्रकरणी तक्रार दाखल करत चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, यापूर्वी दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांचीही एनसीबीकडून चौकशी झाली आहे. त्याचबरोबर अभिनेता अर्जुन रामपाल याला देखील चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर अर्जुनची गर्लफ्रेंड गेब्रिएला आणि तिचा भाऊ अगिसिलाओस यांची देखील NCB कडून चौकशी करण्यात आली होती.