Bollywood Drug Case: कंगना रनौत हिची ड्रग्स प्रकरणी चौकशी का झाली नाही? काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा सवाल
Kangana Ranaut (Photo Credits: Instagram)

फिल्म निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याला एनसीबीने (NCB) समन्स बजावला असून गेल्या वर्षी त्याच्या घरी झालेल्या पार्टीची सर्व माहिती मागितली आहे. दरम्यान, या पार्टीत ड्रग्सचा वापर झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यावरुन महाराष्ट्र काँग्रेस कडून मोठा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी एनसीबी करण जोहरला नोटीस पाठवू शकते मग कंगना रनौत ला का नाही? असा सवाल ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे. विशेष म्हणजे कंगना रनौत हिने स्वत: एका व्हिडिओत तिने ड्रग्सचे सेवन केल्याचे म्हटले असूनही तिला अजून देखील एनसीबी कडून अद्याप तिला कोणतीही नोटीस पाठवण्यात आलेली नाही.

तसंच सावंत यांनी लिहिले की, "करण जोहर च्या पार्टीचा व्हिडिओ 2019 मधील आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देखील होते. तेव्हा का या व्हिडिओची तपासणी का केली गेली नाही?" (मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर कंगना रनौत आनंद व्यक्त करत म्हणाली 'लोकतंत्रचा विजय झाला', Watch Video)

Sachin Sawant Tweet:

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी कोणताही संबंध नसलेल्या मुद्यांवर एनसीबी तपास करत आहे. हा केवळ महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचेही सावंत यांनी म्हटले आहे. तसंच सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शन शोधण्यात एनसीबी अपयशी ठरले आहे. सीबीआयने तर या प्रकरणी मौन बाळगले आहे. दरम्यान, भाजपने सुशांतचे मृत्यू प्रकरण आणि राष्ट्रीय तपास संस्थांचे घाणेरडे राजकारण केल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

Sachin Sawant Tweet:

दरम्यान,  अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाच्या तपासावरुन महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठली. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. मात्र या प्रकरणाचा तपास आता वेगळ्याच दिशेने होत असल्याचे सचिन सावंत यांचे म्हणणे आहे.