Allu Arjun Granted Regular Bail: पुष्पा 2 अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणामुळे (Sandhya Theatre Stampede Case) चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान रेवती नावाच्या 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी हैदराबादच्या नामपल्ली कोर्टाकडून अभिनेत्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने अभिनेता अल्लू अर्जुनला नियमित जामीन मंजूर केला आहे. नामपल्ली कोर्टात आज थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने अभिनेत्याला दिलासा दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, कोर्टाने अभिनेत्याला प्रत्येकी 50 हजार रुपयांचे दोन जामीन सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे नेमक प्रकरण?
4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी ही घटना घडली. वास्तविक, अल्लू अर्जुन चाहत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचला होता. यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आणि चेंगराचेंगरी झाली. या घटनेत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिचा 8 वर्षांचा मुलगा जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा -Allu Arjun: अल्लू अर्जुन आणि पुष्पा चित्रपट निर्मात्यांकडून चेंगराचेंगरीतील मृत महिलेच्या कुटुंबाला 2 कोटींची मदत जाहीर)
नियमित जामिनासाठी याचिका दाखल -
या संपूर्ण प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता, त्यानंतर पोलिसांनी त्याला 13 डिसेंबर रोजी अटक केली होती. 14 डिसेंबर रोजी तेलंगणा उच्च न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. यानंतर अभिनेत्याने नियमित जामिनासाठी याचिका दाखल केली होती. 27 डिसेंबर रोजी अभिनेता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यासाठी हजर झाला. (Allu Arjun: ‘माझ्याबद्दल गैरसमज पसरविण्यात आले,अपमानित झाल्याचे वाटत आहे’; पत्रकार परिषदेत अल्लू अर्जूनचे तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि ओवैसी यांना उत्तर)
अल्लू अर्जुनने मागितली माफी -
अभिनेता अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर आणि पत्रकार परिषदेदरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. काही लोक या प्रकरणी आपले नाव आणि प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत असल्याचेही अल्लू अर्जूनने म्हटलं आहे. (Sandhya Theatre Stampede Tragedy: अभिनेता Allu Arjun च्या अडचणीत वाढ; संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयाने सुनावली 14 दिवसांची कोठडी)
पीडित कुटुंबाला देणार भरपाई -
अल्लू अर्जुन आणि पुष्पा 2 च्या निर्मात्यांनी अलीकडेच पीडितेच्या कुटुंबाला 2 कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली होती. तसेच अभिनेत्याने एक कोटी रुपये दिले होते. तर मिथ्री फिल्म आणि दिग्दर्शक सुकुमार यांनी प्रत्येकी 50 लाख रुपये दिले. महामंडळाचे अध्यक्ष दिल राजू यांनी नुकसानभरपाई म्हणून ही रक्कम कुटुंबाला सुपूर्द केली आहे.