Sandhya Theatre Stampede Tragedy: अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पुष्पा 2 चित्रपटाच्या शानदार यशादरम्यान, साउथ सुपरस्टार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाच्या शोमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आज, शुक्रवार, 13 डिसेंबर रोजी हैदराबाद पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून चौकशीसाठी अटक केली. आता या प्रकरणी एक मोठे अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अल्लू अर्जुनला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अटकेनंतर अल्लू अर्जुनला हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील ताज्या घडामोडींनुसार अल्लू अर्जुनचे वकील या कारवाईविरोधात अपील करणार आहेत आणि उच्च न्यायालयात जाणार आहेत.
जाणून घ्या काय आहे प्रकरण-
हे प्रकरण 4 डिसेंबर रोजी पुष्पा 2 च्या स्क्रिनिंग दरम्यान हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीशी संबंधित आहे, ज्यामध्ये 35 वर्षीय महिलेचा (रेवती) मृत्यू झाला आणि इतर दोन जखमी झाले. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांनी अभिनेता आणि थिएटर व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला होता. अल्लू अर्जुनवर पोलिसांना न कळवता चित्रपटगृहात पोहोचल्याचा आरोप आहे. त्यामुळे योग्य सुरक्षा व्यवस्था होऊ शकली नाही. (हेही वाचा: 'Pushpa 2' Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू; हैदराबाद पोलिसांनी Allu Arjun आणि थिएटरच्या व्यवस्थापनाविरुद्ध दाखल केला गुन्हा)
अल्लू अर्जुन थिएटरमध्ये आल्याची माहिती मिळताच सुपरस्टारला पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळली, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि या महिलेचा मृत्यू झाला. इंडिया टुडेशी संबंधित पत्रकार अपूर्व यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनला भारतीय न्याय संहितेच्या कलम 105, 118 (1) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. Aaj, 13 डिसेंबर रोजी सकाळी अल्लू अर्जुनला अटक करण्यासाठी पोलीस आले तेव्हा त्याची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी, भाऊ अल्लू शिरीष आणि वडील अल्लू अरविंद हे देखील त्याच्यासोबत होते. याआधी अल्लूने पीडितेच्या कुटुंबाला 25 लाख रुपये देणे आणि शक्य ती सर्व मदत करण्याबाबत आश्वासन दिले होते.