अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाच्या हैदराबादमध्ये प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. अल्लू अर्जुन बुधवारी रात्री स्क्रिनिंगसाठी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पोहोचला होता. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी चेंअल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाच्या हैदराबादमध्ये प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. अल्लू अर्जुन बुधवारी रात्री स्क्रिनिंगसाठी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पोहोचला होता. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी चेंगराचेंगरी झाली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. या चेंगराचेंगरीमध्ये रेवती नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला. आता हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि संध्या थिएटरच्या व्यवस्थापनावरही गुन्हा दाखल केला आहे. अल्लू अर्जुन कोणतीही पूर्वसूचना न देता थिएटरमध्ये पोहोचला होता.

हैदराबाद पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, अल्लू अर्जुन पूर्वसूचनेशिवाय प्रीमियर शोमध्ये पोहोचला, ज्यामुळे अतिरिक्त सुरक्षा आणि गर्दी हाताळण्यासाठी पुरेशी व्यवस्था केली जाऊ शकली नाही. थिएटर व्यवस्थापन किंवा कलाकाराच्या टीमनेही याबाबत कोणतीही पूर्व माहिती दिली नाही. अल्लू अर्जुनच्या प्रवेशासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी थिएटरमध्ये स्वतंत्र प्रवेश मार्गही नव्हता. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'पुष्पा 2 द रुल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. केवळ ॲडव्हान्स बुकींगद्वारे चित्रपटाने प्रचंड नफा कमावला. (हेही वाचा: ‘Should I Call Bishnoi?’: सलमान खानच्या शूटिंगच्या ठिकाणी एका व्यक्तीचा बेकायदेशीरपणे घुसकोरी करण्याचा प्रयत्न; दिली लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी)

'Pushpa 2' Premiere Stampede:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)