बॉलिवूड स्टार सलमान खानशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या शूटिंग साईटवर शूटिंगदरम्यान एका व्यक्तीने बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा इतरांना त्या व्यक्तीचा संशय आला तेव्हा सेटवरील लोकांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत्रले. सध्या पोलीस पथकाने संशयिताला मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले आहे. आरोपींची ओळख पटल्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करणार आहे. माहितीनुसार, सलमान खान बुधवारी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात एका चित्रपटाचे शूटिंग करत होता. त्यानंतर एकजण शूटिंगच्या ठिकाणी घुसला.

गेल्या महिन्यातच पोलिसांनी सलमान खानला धमकावल्याप्रकरणी कर्नाटकातून एका व्यक्तीला अटक केली होती. त्या व्यक्तीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याआधीही सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या वर्षी एप्रिल महिन्यात अभिनेत्याच्या वांद्रे येथील घराबाहेर संशयित टोळी सदस्यांनी गोळीबार केला होता. काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई पोलिसांनी बिश्नोई टोळीने खानच्या हत्येचा कट उघड केला होता, त्यानंतर अभिनेत्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती. सलमान खानला मुंबई पोलिसांकडून वाय प्लस श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी सदैव हजर असतात. त्याचा वैयक्तिक अंगरक्षक शेराही त्याच्यासोबत राहतो. (हेही वाचा: Mamta Kulkarni in Mumbai After 25 Years: ममता कुलकर्णी 25 वर्षांनी मुंबईत परतली; मातृभूमी पाहून अश्रू अनावर)

Security Breach at Salman Khan’s Shooting Location-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)