Allu Arjun: ‘माझ्याबद्दल गैरसमज पसरविण्यात आले,अपमानित झाल्याचे वाटत आहे’; पत्रकार परिषदेत अल्लू अर्जूनचे तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि ओवैसी यांना उत्तर

पुष्पा-2 चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे अभिनेता अल्लू अर्जून याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याच्या अटकेनंतर सुटका असे सगळे घडले. आता राजकीय टीकेवर त्याने उत्तर दिले आहे.

Allu Arjun: ‘माझ्याबद्दल गैरसमज पसरविण्यात आले,अपमानित झाल्याचे वाटत आहे’; पत्रकार परिषदेत अल्लू अर्जूनचे तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि ओवैसी यांना उत्तर
Photo Credit- X

Allu Arjun: ‘पुष्पा – 2’ (Pushpa 2) चित्रपट सध्या त्याच्या कथेमुळे नाही तर अल्लू अर्जून याच्यावर येणाऱ्या समस्यांमुळे चर्चेत आहे. चित्रपट बॉक्स ऑफीसवर पैशांचा पाऊस पाडत आहे. चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले. असे असले तरीही साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun) याच्यावर संध्या थिएटरमध्ये एका महिलेचा चेंगराचेंगरीत (Sandhya Theatre Accident)मृत्यू झाल्यानंतर टिका होत आहे. त्याच्यावर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी विधीमंडळात टीका केली आहे. त्यास आता सुपरस्टार अल्लू अर्जून याने प्रत्युत्तर दिले आहे. (Allu Arjun Released from Jail: संपूर्ण रात्र तुरुंगात घालवल्यानंतर अल्लू अर्जुनची सकाळी सुटका; वडील-सासरे आले घेण्यासाठी)

अल्लू अर्जून याने शनिवारी त्याच्या हैदराबाद येथील जुबली हिल्स स्थित निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली आहे. 'या प्रेस कॉन्फरसला उशीरा आल्याबद्दल त्याने सर्वांची माफी मागितली. मला या धक्क्यातून सावरण्यास वेळ लागला. संध्या थिएटरमध्ये झालेली घटना दुर्भाग्यपूर्ण होती. पीडीत कुटुंबियाबद्दल सहवदेना व्यक्त करतो. दर तासाला जखमी मुलाबद्दल अपडेट मी घेत आहे. आता त्याची तब्येत सुधारत आहे. ही आनंदाची बाब.' असल्याचे अभिनेता अल्लू अर्जून याने म्हटले आहे. (Sandhya Theatre Stampede Tragedy: अभिनेता Allu Arjun च्या अडचणीत वाढ; संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयाने सुनावली 14 दिवसांची कोठडी)

माझ्याबद्दल पसरविण्यात आलेल्या चुकीच्या माहितीबद्दल ही पत्रकार परिषद असल्याचे अल्लू अर्जून याने आहे. 'माझ्याबद्दल गैरसमज पसरविण्यात आले. हे अपमानजनक आहे. या चारित्र्यहननामुळे मी व्यतिथ झालो आहे. अपमानित झाल्याचे वाटत आहे. मी पंधरा दिवसांपासून कुठे जाऊ शकलेलो नाही. कायदेशीररित्या मी बांधला गेलेलो आहे', असे अल्लू अर्जून याने म्हटले आहे.

अल्लू अर्जून याने सांगितले की मी संपूर्ण तनमन झोकून हा चित्रपट केला आहे. मी चित्रपटात जी मेहनत घेतली ती स्क्रीनवर जाऊन पाहू देखील शकलेलो नाही. कारण मी अजूनही थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहीलेला नाही. हा कठीण अनुभव माझ्यासाठी वेगळा आहे. हा माझ्यासाठी शिकण्याचा मोठा प्रसंग आहे. माझ्यासाठी थिएटरमध्ये हा चित्रपट पाहणे आवश्यक होते. कारण आपल्या चुकातून आपण आणखी पुढे अभिनयात बदल करु शकतो असेही अल्लू अर्जून याने म्हटले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2024 08:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).