Photo Credit- X

Allu Arjun Released from Jail:  साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनची(Allu Arjun) शनिवारी सकाळी 7.15 च्या सुमारास हैदराबादच्या चंचलगुडा सेंट्रल जेलमधून सुटला (Allu Arjun Released) झाली. अभिनेत्याला घेण्यासाठी त्याचे सासरे चंद्रशेखर रेड्डी आणि वडील अल्लू अरविंद पोहोचले होते. तेथून कडेकोट बंदोबस्तात ते घराकडे रवाना झाले. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'पुष्पा २' च्या(Pushpa 2: the Rule) स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी अल्लू अर्जुनला शुक्रवारी दुपारी अटक केली होती.

 जामीन मिळूनही एक रात्र तुरुंगात 

'पुष्पा २' च्या स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी अल्लू अर्जुनला शुक्रवारी दुपारी अटक केली होती. यानंतर पोलिसांनी त्याला कनिष्ठ न्यायालयात हजर केले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सायंकाळी उशिरा त्याला या प्रकरणात उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. मात्र, कागदोपत्री उशीर झाल्याने त्यांची तुरुंगातून सुटका झाली नाही. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनला तुरुंगात एक रात्र काढावी लागली.

अल्लू अर्जुन 14 दिवसांच्या कोठडीत

अल्लू अर्जुनला काल रात्री न्यायालयाने 14 दिवसांच्या कोठडीवर पाठवले होते. त्यानंतर त्याला चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले होते. वकिलाच्या म्हणण्यानुसार, त्याला रात्री उशिरापर्यंत जामीन मिळाला होता. मात्र त्याची सुटका झाली नव्हती. तेलंगणा उच्च न्यायालयाने त्यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला. सकाळी त्याची जेलमधून सुटका झाली.

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचे वकील अशोक रेड्डी यांनी हैदराबाद तुरुंग प्रशासनावर टीका केली आहे. वकिलाने सांगितले की, तेलंगणा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीमध्ये तुरुंग अधिकाऱ्याने अल्लू अर्जुनला सोडावे असे स्पष्टपणे लिहिले होते. मात्र,तसे केले नाही याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे.