काय सांगता? बाहुबली फेम अभिनेता Prabhas ने नाकारल्या तब्बल 150 कोटींच्या जाहिराती, जाणून घ्या कारण
प्रभास (Photo Credits : File Photo)

दक्षिण भारतीय चित्रपटांमधील सुपरस्टार बाहुबली फेम प्रभासने (Prabhas) आज संपूर्ण देशात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचे कोट्यवधींमध्ये चाहते आहे. देशातच नव्हे तर परदेशातही त्याची क्रेझ आहे. अशा परिस्थितीत प्रभासशी संबंधित एक रंजक बातमी समोर आली आहे. अहवालानुसार, प्रभासने गेल्या एका वर्षात तब्बल 150 कोटी रुपयांच्या ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंटला (Brand Endorsements) म्हणजेच जाहिरातींना नकार दिला आहे. शक्यतो कलाकार त्यांचा एखादा चित्रपट हिट ठरताच अनेक जाहिराती करून कोट्यावधी रुपये कमावतात, मात्र याबाबत प्रभासने घेतलेला निर्णय आश्चर्यचकित करणारा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या प्रभास एक लोकप्रिय अभिनेता म्हणून व त्यामुळे आलेल्या जबादारीमुळे ज्या स्तरावर आहे, तिथे त्याला घाईघाईने कोणत्याही ब्रँडशी करार करायचा नाही. प्रभासला जनमानसातली आपली उपस्थिती अत्यंत काळजीपूर्वक आणि योग्य मार्गाने नोंदवायची आहे. म्हणूनच त्याने आतापर्यंत इतके ब्रँड नाकारले आहेत. प्रभास ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंटसाठी सुमारे 18 कोटी रुपये आकारतो. यापूर्वी प्रभासने अनेक ब्रँड्सला सपोर्ट केला आहे आणि पुढेही करत राहील. परंतु कोणत्या ब्रँड्सशी जोडले जायचे याबाबत तो फार सिलेक्टीव्ह आहे. (हेही वाचा: मुंबईमध्ये Ajay Devgn ने खरेदी केले 47 कोटींचे घर? 18.75 कोटींचे कर्ज घेतल्याची चर्चा)

एखाद्या ब्रँडशी स्वतःला जोडण्याविषयी प्रभासची काही कठोर धोरणे आहेत. प्रभास त्याला पसंत असलेल्याच एंडोर्समेंटशी जुडतो. म्हणूनच त्याने गेल्या एक वर्षात 150 कोटी रुपयांचे ब्रँड्स नाकारले.

दरम्यान, वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रभास राधे श्याम, आदिपुरुष अशा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याने दीपिका पादुकोणसमवेतही एक चित्रपट साईन केला आहे, ज्याचे नाव अजून निश्चित झाले नाही. अभिनेत्री पूजा हेगडे प्रभास सोबत राधे श्याम या चित्रपटात दिसणार आहे. प्रभास आदिपुरुष मध्ये भगवान श्री रामच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री कृती सेनन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर सैफ अली खान रावणच्या भूमिकेत दिसणार आहे.