मुंबईमध्ये Ajay Devgn ने खरेदी केले 47 कोटींचे घर? 18.75 कोटींचे कर्ज घेतल्याची चर्चा
Ajay Devgn (Photo Credit : Instagram)

अभिनेता अजय देवगनने (Ajay Devgn) कोरोना साथीच्या दरम्यान लक्झरी प्रॉपर्टी खरेदी केली आहेत. अजय देवगणने मुंबईच्या (Mumbai) जुहू भागात हे अलिशान घर विकत घेतले आहे. वृत्तानुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान हा करार झाला होता. कपोल सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये अजय देवगणचा हा नवीन बंगला आहे. पूर्वी हा बंगला भावेश बाळकृष्ण वालिया नावाच्या व्यक्तीच्या मालकीचा होता, जो आता अजय देवगणची आई वीणा वीरू देवगण आणि विशाल वीरू देवगण या दोघांच्या नावे बदली झाला आहे.

अजय देवगणच्या या बंगल्याबद्दल आता मोठी बातमी समोर आली आहे, त्यानुसार अजय देवगणने या बंगल्यासाठी कोट्यवधींचे कर्ज घेतले आहे. 'बॉलिवूड हंगामा'च्या वृत्तानुसार, या बंगल्यासाठी अभिनेत्याने 18.75 कोटींचे कर्ज घेतले आहे. बंगल्याची किंमत सुमारे 47 कोटी आहे, त्यासाठी अजय देवगणने 2.73 कोटी मुद्रांक शुल्क भरले आहे. गेल्या वर्षीच अजय देवगन आणि काजोल बद्दल चर्चा होती की दोघेही स्वतःसाठी नवीन घर शोधत आहेत. आता अभिनेत्याला स्वतःसाठी एक नवीन घर सापडले आहे.

अजय देवगणचा हा नवीन अलिशान बंगला 474.4 चौरस मीटरपर्यंत पसरलेला आहे. त्याने 29 डिसेंबर 2020 रोजी बंगला विकत घेतला, तर 27 एप्रिल 2021 रोजी कर्ज घेण्यात आले. अजय देवगणचा हा नवीन बंगला त्यांचे सध्याचे घर शिव शक्तीजवळ आहे. या ठिकाणी तो व त्याचे कुटुंब सध्या वास्त्यव्यास आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अजय देवगण सध्या सूर्यवंशी', 'गंगूबाई काठियावाड़ी', 'RRR', 'मैदान', 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' अशा चित्रपटांमध्ये भूमिका सकारात आहे.