'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटात आयुष्मान खुराना सोबत रोमांन्स करताना दिसणार राजकुमार राव?
Ayushmann and Rajkumar (Photo Credits: Instagram)

वेगवेगळ्या धाटणीचे विषय असलेल्या चित्रपटात काम करणे हा आयुष्मान खुरानाच जणू हातखंडाच बनला आहे. 2018 मध्ये 'बधाई हो' आणि 'अंधाधुन' सारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता 2019 मध्ये आपली जादू पसरवायला आयुष्मान (Ayushmann Khurrana) सज्ज झालाय. नुकताच त्याचा 'आर्किटल 15' हा चित्रपट प्रदर्शित झालाय हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगला चालतोय. त्यातच आता 2017 मध्ये आलेल्या 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटाचा सिक्वेल येत आहे. 'शुभ मंगल ज्यादा सावधान' (Shubh Mangal Zyada Savdhaan) असे या चित्रपटाचे नाव असून या हा चित्रपट समलैंगिक प्रेम कहानीवर आधारित आहे.

या चित्रपटात आयुष्मान खुराना चक्क राजकुमार राव (Rajkummar Rao) सोबत रोमांस करताना दिसणार आहे. अजूनपर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरीही, अशी चर्चा कानावर येत आहे. राजकुमार राव आणि आयुष्मान ने याआधी 'बरेली की बर्फी' या चित्रपटात एकत्र काम केले होते. बरेली की बर्फी या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी यांनी केले होते.

राजकुमार राव विषयी बोलायचे झाले तर, या वर्षी फेब्रुवारी मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' चित्रपटात सोनम कपूर सोबत दिसला होता. हा चित्रपट म्हणावा तितका बॉक्स ऑफिसवर चालला नाही. या चित्रपटात अनिल कपूर सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसले होते.

हेही वाचा- 'Judgementall Hai Kya' Official Trailer: वेडेपणाच्या सोंगाआड मर्डर मिस्ट्री सांगणारा कंगना आणि राजकुमारचा 'Judgementall Hai Kya' चा ट्रेलर प्रदर्शित

याशिवाय राजकुमार राव लवकरच कंगना रनौतसोबत 'जजमेंटल है क्या' या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कोवेलामुदी यांनी केले होते. राजकुमार राव आणि कंगना रनौत याआधी 'क्वीन' चित्रपटात एकत्र काम केले होते.