'Judgementall Hai Kya' Official Trailer: वेडेपणाच्या सोंगाआड मर्डर मिस्ट्री सांगणारा कंगना आणि राजकुमारचा 'Judgementall Hai Kya' चा ट्रेलर प्रदर्शित
Judgementall Hai Kya Trailer (Photo Credits: YouTube)

गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला कंगना रनौत आणि राजकुमार राव यांचा नवा चित्रपट 'जजमेंटल है क्या' (Judgementall Hai Kya) चा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून यात मर्डर मिस्ट्री, वेडेपणाचा कळस आणि कंगना (Kangana Ranaut) आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) यांची अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळणार असेच दिसतेय. हा ट्रेलर पाहून या चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढलीय.

एका ह्त्येच्या आरोपाखाली राजकुमार म्हणजेच 'केशव' आणि कंगना म्हणजेच 'बॉबी' हे दोघंही कसे गुंततात आणि नेमकं कथानक पुढे कसं जातं हे चित्रपटातूनच उलगडणार आहे.

एकता कपूरच्या 'बालाजी टेलिफिल्म लिमिटेड' अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून प्रकाश कोवेलमुडीने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करुन प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरलेली कंगना या चित्रपटातही एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. तिला तोडीस तोड म्हणून राजकुमार राव ही एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा- Mental Hai Kya- 'कंगना रनौत' आणि 'राजकुमार राव' चा 'मेंटल है क्या' वादाच्या भोवऱ्यात, इंडिअन सायकेट्रिक सोसायटीने केली सेन्सर बोर्डाला तक्रार

या ट्रेलरने या चित्रपटाची उत्कंठा शिगेला पोहोचली असली तरीही प्रत्यक्षात यात काय पाहायला मिळेल हे येत्या 26 जुलैला कळेलच.