देशावर ओढावलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना सारेच करत आहेत. संकट परतवून लावण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत आणि या प्रयत्नांना अनेकांची साथ मिळत आहे. या संकटकाळात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे सरसावले. यात आता अभिनेत्री आयशा टाकिया (Ayesha Takia) ने देखील उडी घेतली आहे. पती फरहान आजमी (Farhan Azmi) सह तिने कोरोना विरुद्धच्या लढ्यात मदतीचा हात पुढे केला आहे. फरहान आजमी याने मुंबई महानगरपालिकेला त्यांचे एक हॉलेट क्वारंटाईन सेंटर (Quarantine Center) उभारण्यासाठी दिले आहे. (कोरोना व्हायरस बाधितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी शाहरुख खान याने दिली ऑफिसची जागा; BMC ने ट्विट करत मानले आभार)
याची माहिती फरहान याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरुन दिली आहे. पोस्टमध्ये फरहान याने लिहिले की, "कुलाबा येथील गल्फ हॉटेल कौतुकास पात्र आहे. कारण कठीण काळात त्याची मदत होत आहे. यापूर्वी 1993 साली झालेल्या दंगलीत लोकांना तिथे सुरक्षित आसरा मिळाला होता. कोरोना संकटाच्या गंभीर परिस्थितीत सर्वांची सुरक्षा करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी देखील सज्ज आहे."
पहा पोस्ट:
आयशा टाकिया आणि फरहान आजमी यांचा विवाह 2009 झाला असून त्या दोघांना एक मुलगा देखीला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तर त्यातील अधिक रुग्ण मुंबईत आहेत आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेत आयशाने तिच्या पती समवेत उचललेले पाऊल अत्यंत स्त्युत्य आहे.