अंकिता लोखंडे हिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या सुशांत सिंह राजपूतच्या आईच्या फोटोवर श्वेता सिंह किर्ति ने दिली 'ही' भावूक प्रतिक्रिया
Ankita Lokhande (Photo Credits: Instagram)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याला न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्या कुटूंबियांसह त्याचे सर्व चाहते एकवटले आहेत. त्याची एक चाहती आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने देखील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींना वाचा फोडली आहे. नुकताच तिने सुशांतच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर त्याच्या आईचाही फोटो शेअर करून भावूक पोस्ट लिहिली आहे. अंकिता सुशांतच्या निधनाचा धक्का अजूनही पचवू शकली नसून तिच्यासाठी ही गोष्ट स्विकारणं खूप अवघड झालं आहे. तिच्या या पोस्टवर सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ति हिने भावूक प्रतिक्रिया दिली आहे.

अंकिताने सुशांतच्या आईचा फोटो शेअर करुन "मला खात्री आहे की, तुम्ही दोघे एकत्र असाल" असे भावूक कॅप्शन लिहिले आहे. ही पोस्ट पाहून सुशांतची बहिण श्वेता देखील भावूक झाली आणि यावर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. Pavitra Rishta Part 2: सुशांत सिंह राजपूत-अंकिता लोखंडे यांची लोकप्रिय मालिका 'पवित्र रिश्ता' चा दुसरा भाग बनवणार एकता कपूर?

Ankita Lokhande (Photo Credits: Instagram)

"हो ते एकत्रच असतील. लव्ह यू बेबी. अशीच स्ट्राँग रहा. आपल्याला न्याय मिळेपर्यंत लढायचं आहे" अशी प्रतिक्रिया श्वेता सिंह किर्ति याने दिली आहे.

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने रिपब्लिक टिव्हीशी बोलताना असे सांगितले आहे की, "सुशांत खूप मनमेळाऊ व्यक्ती होता. नेहमी आनंदी असणारा सुशांत डिप्रेशनमध्ये असूच शकत नाही." याबाबत अधिक माहिती देताना अंकिता म्हणाली, "सुशांत सारखा स्वप्न बघणारा मुलगा तिने आजपर्यंत पाहिला नाही. सुशांतकडे एक डायरी आहे ज्यात त्याने पुढील 5 वर्षांचे प्लान्स लिहिले होते. करिअरमध्ये तो खूप यशस्वी होता. त्यामुळे तो एस पाऊल कधी उचलूच शकणार नाही. हे काहीतरी वेगळच प्रकरण आहे."