Pavitra Rishta Part 2: सुशांत सिंह राजपूत-अंकिता लोखंडे यांची लोकप्रिय मालिका 'पवित्र रिश्ता' चा दुसरा भाग बनवणार एकता कपूर?
Pavitra Rishta And Ekta Kapoor (Photo Credits: Instagram)

झी टीव्ही (Zee TV) वरील सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) यांची प्रमुख भूमिका असलेली 'पवित्र रिश्ता' या मालिकेचा भाग 2 (Pavitra Rishta Part 2) येण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय शो होता. या शो मुळे मानव आणि अर्चना या पात्रामुळे सुशांत आणि अंकिताला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. एकता कपूर (Ekta Kapoor) निर्मित या शोच्या माध्यमातूनच सुशांत आणि अंकिताने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 2009 मध्ये सुरु झालेला हा कार्यक्रम ऑक्टोबर 2014 पर्यंत चालला. आता ताज्या अपडेट्सनुसार, असे सांगण्यात येत आहे की, आता तब्बल 6 वर्षानंतर हा शो पुन्हा टिव्हीवर येण्याची शक्यता आहे.

असा अंदाज वर्तवला जात आहे की, एकता कपूर या मालिकेचा दुसरा भाग लवकर आणू सकते. मुंबई मिरर च्या रिपोर्टनुसार, अंकिता लोखंडे ने एकताशी संपर्क करुन विनंती केली की, दिवंगत सुशांतला एक श्रद्धांजली म्हणून या कार्यक्रमाचा दुसरा भाग बनवला जावा.

हेदेखील वाचा- Pavitra Rishta Fund: सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत एकता कपूरने सुरु केला ‘पवित्र रिश्ता फंड’; जाणून घ्या काय आहे उद्देश

या मालिकेत सुशांत ऑटोमोबाईल मॅकेनिक दाखवला होता जो अर्चना म्हणजे अंकितावर प्रचंड प्रेम करायचा. मुळात याच मालिकेने अंकिता आणि सुशांतला खरी ओळख मिळवून दिली. त्यामुळे या मालिकेचा दुसरा भाग आल्यास सुशांतला खरी श्रद्धांजली दिली जाईल असे एकता कपूर हिचे म्हणणे आहे.

असे सांगण्यात येत आहे की, अंकिताची विनंती एकताने मान्य केली आहे. आता ती आपल्या टीमसोबत बसून यावर चर्चा करेल जेणेकरून हा शो टिव्हीवर पुन्हा आणता येईल.