कॉमिक पोस्टरमुळे अमूल (Amul) नेहमी चर्चेत राहीले आहे. लॉकडाऊन दरम्यान रामायणच्या रिटेलिकास्टला जगभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी ही अमूल आपल्या अंदाजात या कार्यक्रमाला ट्रिब्यूट केले होते. यातच कोरोनावर मात करून घरी परतणारे बॉलिवडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासाठीही अमूलने एक खास कॉमिक पोस्टर तयार केले आहे. यासाठी अमिताभ बच्चन यांनी अमूलचे मनापासून आभार मानले आहेत. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती कळताच सिनेसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का लागला होता. मात्र, नानावटी रुग्णालयात तब्बल 23 दिवस उपाचार घेतल्यानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
अमिताभ बच्चन यांचा 11 जुलै रोजी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच दिवशी रात्री त्यांना नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बच्चन कुटुंबातील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात अभिषेक बच्चनचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. अभिषेक बच्चनलाही 11 जुलै रोजी नानावटीमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर अमिताभ बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. हे देखील वाचा- Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण 'सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांनी 25 फेब्रुवारीला कोणतीही लेखी तक्रार दिली नव्हती'
अमिताभ बच्चन यांची इंस्टाग्राम पोस्ट-
अमूलने तयार केलेल्या कॉमिक पोस्टवरून नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला होता. यावर अमिताभ बच्चन यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. अमूलने मोफत हे कार्टून बनवले नसेल. काहीतरी रक्कम घेतलीच असेल. दरवर्षी ही रक्कम वाढतच असणार, असा आरोप करण्यात आला होता. परंतु, तुमचा खूप मोठा गैरसमज झाला आहे. जर तुम्हाला सत्य माहित नसेल तर स्वत:च्या स्वच्छ तोंडाला स्वच्छच ठेवावे. या कॉमिक पोस्टरसाठी मी कधीच अमूलला विनंती केली नाही आणि करतही नाही. बाण सोडण्याआधी नीट विचार करावा नाहीतर ते बाण पुन्हा तुमच्यावरच येऊन पडेल. जसे की आता झाले. माझ्या सभ्य संस्कारांनी त्याचे वर्णन करण्यास थांबवले आहे, अशा शब्दात अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला चांगलेच खडसावले होते.