बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट च्या घरी आली नवीन पाहूणी; इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत म्हणाली, आमच्या नवीन बाळाला भेटा
आलिया भट्ट (फोटो सौजन्य-ट्वीटर)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून (Instagram Account) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे आलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या फोटोत आलियासोबत एक काळीभोर मांजर आणि तिची बहीन शाहिन भट (Shaheen Bhatt) दिसत आहे. आलियाने या फोटोच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना नव्या पाहूणीची ओळख पटवून दिली आहे. तिने या मांजरी सोबतचा क्युट सेल्फी शेअर केला आहे. या फोटोला आलियाच्या चाहत्यांनी लाईक तसेच कमेंन्ट्स दिल्या आहेत.

आलियाने इन्स्टाग्रामवर या मांजरीचा फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, 'आता आमचं त्रिकूट पूर्ण झालं. आमच्या नवीन बाळाला भेटा. हिचं नाव ज्युनिपर आहे. हिला सेल्फी काढायला फार आवडतं.' आलियाने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (हेही वाचा -Urvashi Rautela Marriage: अभिनेत्री उर्वशी रौतेला ने लॉकडाऊनमध्ये गौतम गुलाटीसोबत केलं लग्न? पहा व्हायरल फोटो)

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचा वाद पेटला आहे. सुशांतच्या निधनानंतर नेटीझन्सनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टिका करण्यास सुरुवात केली आहे. नेटीझन्सनी नेपोटिझमच्या मुद्दयावरुन अनेक स्टारकिड्सवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आलिया भटलादेखील नेटीझन्सनी नेपोटिझमच्या मुद्दयावरून ट्रोल केलं आहे. सोशल मीडियावर आलियाच्या 'सडक 2' चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे.