Dhoom 4 मध्ये Salman Khan सोबत झळकणार Akshay Kumar? अक्षयने दिले 'हे' उत्तर
Akshay Kumar & Salman Khan (Photo Credits: Instagram)

Akshay Kumar Breaks Silence on Dhoom 4: आदित्य चोप्रा यांचा सुपरहिट सिनेमा 'धूम' (Dhoom) च्या चौथ्या सीजनमध्ये धूम 4 मध्ये अक्षय कुमार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे, अशा बातम्या सिनेवर्तुळात रंगू लागल्या होत्या. 'धूम 4' मध्ये सलमान खान सोबत अक्षय कुमारही झळकणार, अशा चर्चांना उधाण आले होते. यावर अखेर अक्षय कुमार ने खुलासा केला आहे. या बातम्या फेक (Fake) असल्याचे अक्षयने म्हटले आहे. दरम्यान, धूम 4 सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यामुळे याबाबत अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

धूम 4 च्या कास्टिंगबद्दल अक्षयला विचारले असता असता तो म्हणाला, "माझ्याकडे तुमच्यासाठी केवळ 2 शब्द आहेत- फेक न्यूज." त्यानंतर सिनेमा उशिरा रिलीज होण्याने तुम्हाला त्रास होतो का? असा प्रश्न विचारला असता 'काम करा, फळाची अपेक्ष करु नका', असे उत्तर अक्षयने दिले. पुढे अक्षय म्हणतो की, "देवाची माझ्यावर कृपा आहे, याचा मला आनंद आहे. मला हवे ते सिनेमे मी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करु शकतो. ती मुभा मला आहे, याचे मला समाधान आहे. मला माझे काम प्रामाणिकपणे करायला हवे. बाकी सगळं नशिबात जे लिहिलं असेल तसं होईल." (Gautam Gambhir च्या संस्थेला Akshay Kumar ने केली मोठी मदत; कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी दिले 1 कोटी रुपये)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

दरम्यान, सध्या अक्षय कुमार अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. यात 'सूर्यवंशी', बेल बॉटम', 'अतरंगी रे', 'पृथ्वीराज', 'रामसेतु', बच्चन पांडे', 'रक्षा बंधन' आणि ह माय गॉड 2' या सिनेमांचा समावेश आहे.