देशात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. कोरोनावर नियंत्रण ठेवणे सरकारसाठी दिवसेंदिवस अवघड होत आहे. अशा परिस्थितीत लोक पुन्हा एकदा त्यांच्या वतीने मदतीचा हात पुढे करत आहेत. अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) ने पुन्हा एकदा लोकांना मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे. अक्षय कुमारने गौतम गंभीर (Gautam Gambhir) च्या संस्थेला 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. वास्तविक, गौतमची संस्था गरीब लोकांच्या अन्नाची व्यवस्था करते. अक्षय कुमारच्या मदतीनंतर गौतम गंभीर यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली आहे.
गौतम गंभीरने सोशल मीडियावर लिहिलं आहे की, 'यावेळी प्रत्येक मदत ही एक आशेचा किरण आहे. अक्षय कुमार यांनी गौतम गंभीर फाउंडेशनला 1 कोटी रुपयांची मदत दिल्याबद्दल त्यांचे आभार. या पैशाने गरजू लोकांना अन्न, औषधे आणि ऑक्सिजनची व्यवस्था केली जाईल.' (वाचा - Ramyug Teaser Released: दिग्दर्शक कुणाल कोहलीची वेब सीरिज 'रामयुग' चा टीझर रिलीज; एमएक्स प्लेयरवर पाहता येणार)
Every help in this gloom comes as a ray of hope. Thanks a lot @akshaykumar for committing Rs 1 crore to #GGF for food, meds and oxygen for the needy! God bless 🙏🏻 #InThisTogether @ggf_india
— Gautam Gambhir (@GautamGambhir) April 24, 2021
गौतम गंभीरच्या या ट्विटला उत्तर देताना अक्षय कुमारने लिहिलं आहे की, 'ही खरोखर कठीण वेळ आहे. मला आनंद वाटतो की, मी मदत करू शकलो. लवकरचं या संकटातून बाहेर पडण्याची आशा आहे. सुरक्षित रहा.'
These are really tough times, @GautamGambhir. Glad I could help. Wish we all get out of this crisis soon. Stay Safe 🙏🏻
— Akshay Kumar (@akshaykumar) April 24, 2021
अक्षय कुमारच्या या कामगिरीनंतर लोक पुन्हा एकदा अभिनेत्याचे कौतुक करत आहेत. याआधीही अक्षय कुमारने मदतीचा हात पुढे केला होता. यापूर्वी अक्षय कुमारने पीएम मोदी फंडात 24 कोटी रुपयांची देणगी दिली होती.