Sooryavanshi: अॅक्शन सीन संपताच अक्षय कुमार ने आपल्या प्रशिक्षकावर रोखली बंदूक, पाहा मजेशीर फोटो
Akshay Kumar (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) नेहमीच आपल्या एकाहून एक सरस अशा स्टंटमुळे चर्चेत असतो. त्याच्या प्रत्येक स्टंट मागे आणि त्याच्या प्रशिक्षकाचीही तितकीच मेहनत असते. सध्या अक्षय कुमार आपला नवीन चित्रपट 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयसोबत कैटरीना कैफ (Katrina Kaif) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतीच या दोघांनी टिप टिप बरसा पानी (Tip Tip Barsa Pani) गाण्याचे शूटिंग पुर्ण केले आहे. त्याचे बरेच फोटो सोशल मिडियावर व्हायरलही झाले आहेत. त्यातच आता भर म्हणून या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चा एक मजेदार फोटो अक्कीने शेअर केला आहे.

ह्या फोटोत अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी (Rohit Shetty) सह चित्रपटातील इतर कलाकार हातात बंदूक घेऊन त्याचा निशाणा खुद्द अॅक्शन प्रशिक्षकावर साधला आहे.

या फोटोखाली अक्षय कुमार ने असेही म्हटले आहे की, "जेव्हा तुमचे अॅक्शन संपते तेव्हा एकच गोष्ट उरते ती म्हणजे ती म्हणजे फाइट मास्टरला शूट करणे."

हेही वाचा- सूर्यवंंशी सिनेमामध्ये 'टिप टिप बरसा...' गाण्यावर अक्षय-कैटरिना थिरकरणार

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यवंशी चित्रपटात टिप टिप बरसा पानी गाण्याला रिक्रिएट केल्यानंतर रवीना टंडन ने सुद्धा यावर भाष्य केले आहे. ती म्हणाली की, "मला रिमिक्स गाणी खूप आवडतात. त्यात ह्या चित्रपटाद्वारे अक्षय कुमार आणि कैटरीना कैफ वर्षानंतर एकत्र दिसतील."