सूर्यवंंशी सिनेमामध्ये 'टिप टिप बरसा...' गाण्यावर अक्षय-कैटरिना थिरकरणार
Tip Tip Barsa Paani (Photo Credits: Movie Stills)

अक्षय कुमार (Akshay Kumar)आणि कैटरीना कैफ (Katrina Kaif) ही जोडी अनेक दिवसांनी पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) या सिनेमामध्ये अक्षय आणि कैटरिना झळकणार आहे. लवकरच हैदराबादमध्ये या सिनेमाचं शेड्युल सुरू होणार असून 'टिप टिप बरसा पानी...' (Tip Tip Barsa Paani)  या प्रसिद्ध गाण्यावर अक्षय - कैटरिना झळकणार आहे. रोहित शेट्टीने या गाण्याचे मालकी हक्क विकत घेतले असल्याचं सांगण्यात आले आहेत. 'सूर्यवंशी' सिनेमातील अक्षय कुमार याचा पोलिस अवतारातील दमदार फर्स्ट लूक! (Photo)

'पिपिंग मून' ने दिलेल्या माहितीनुसार, रामोजी फिल्म सिटीमध्ये अक्षय आणि कैटरिना या गाण्याचं शूटिंग करणार आहेत. टिप टिप बरसा... हे मूळ गाणं अक्षय कुमार आणि रविना टंडन यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. 'मोहरा' सिनेमातील अल्का याग्निक आणि उअदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं आजही लोकप्रिय आहे.

सूर्यवंशी हा सिनेमा 27 मार्च 2020 ला रिलीज होणार आहे. या सिनेमात अक्षय एटीएस ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. त्याच्यासोबत गुलशन ग्रोव्हर, नीना गुप्ता हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.