Akshay Kumar's Daughter Nitara Kumar Birthday: अक्षय कुमार ने मुलगी नितारा कुमार च्या 8 व्या वाढदिवसानिमित्त खास फोटो शेअर करत दिला 'हा' संदेश
Akshay Kumar's Daughter Nitara Kumar (Photo Credits: Twitter)

Akshay Kumar's Daughter Nitara Kumar Birthday: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar's) ची मुलगी नितारा कुमार (Nitara Kumar) आज 8 वर्षांची आहे. या खास दिवशी अक्षयने आपल्या मुलीसह त्याचा एक खास फोटो शेअर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्याने कॅप्शन देताना अक्षयने नितारावरील प्रेम व्यक्त केलं आहे. या फोटोमध्ये अक्षय आपली मुलगी नितारासोबत पार्कमध्ये खेळताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अक्षय कुमारने म्हटलं आहे की, '2020 या वर्षातील शेवटच्या काही दिवसांमध्ये मला माझ्या मुलांकरिता जास्तीत-जास्त वेळ देता आला. हे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आहे. 2020 हे वर्ष माझ्या आयुष्यातील सिल्वर लाइनिंग आहे. माझ्या राजकुमारीला 8 व्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मी जितका विचार केला त्यापेक्षा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो,' असंही अक्षयने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या पोस्टवरून अक्षयचं आपल्या मुलीविषयीचं प्रेम दिसून येतं. अक्षय कुमारने शेअर केलेल्या या फोटोला अनेकांनी लाईक तसेच कमेन्टस दिल्या आहेत. याशिवाय अनेक दिग्गज कलाकारांनी निताराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयला मुलगी नितारा आणि आरव कुमार अशी दोन आपत्य आहेत. (हेही वाचा - Mirzapur: मिर्जापूर चा पहिला सीझन फ्री मध्ये पाहण्याची संधी, येथे पहा डिटेल्स)

अक्षय कुमारच्या वर्कफ्रन्टबद्दल बोलायचं झालं तर, अक्षयची मुख्य भूमिका असणारा 'लक्ष्मी बॉम्ब' 9 नोव्हेंबर 2020 ला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अक्षयच्या बेल बॉटम चित्रपटाचीही सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान, अक्षयने 18 वर्षांपासूनचा नियम मोडला आहे.

अक्षयने गेल्या 18 वर्षांपासून दिवसातील केवळ 8 तास काम करत आला आहे. परंतु, या चित्रपटाच्या शूटींगसाठी त्याने आपली शिफ्ट डबल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रॉडक्शन हाऊसचे पैसे वाचवण्यासाठी अक्षयने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलं असल्याचं बोललं जात आहे. लॉकडाऊननंतरचा अक्षयचा हा पहिला चित्रपट आहे.