Mirzapur: मिर्जापूर चा पहिला सीझन फ्री मध्ये पाहण्याची संधी, येथे पहा डिटेल्स
मिरजापूर (Photo Credits-File Photo )

Mirzapur 2: अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime) वरील प्रसिद्ध वेब शो 'मिरजापूर' चा दुसरा सीझन येणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओची टीमने सर्व प्रेक्षकांसाठी फ्री मध्ये पहिला सीझन पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. मिर्जापूरचा पहिला सीझन स्ट्रिमिंगसाठी उपलब्ध आहे. तर प्रेक्षकांना दुसऱ्या सीझनसाठी प्राइम व्हिडिओने त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर त्यांचा पहिला सीजन अपलोड केला आहे.(Akshay Kumar's Look in Bell Bottom: अक्षय कुमार चा 'बेल बॉटम' चित्रपटातील फर्स्ट लूक आला समोर, सोशल मिडियावर शेअर केला फोटो)

मिर्जापूर ही एक कालीन भैय्याची कथा आहे. जो मिर्जापूरचा राजा आहे. त्याची लढाई पंडित ब्रदर्स, गुड्डू आणि बबलू यांच्यासोबत आहे. या शो चा प्रिमियर 16 नोव्हेंबर 2018 मध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर करण्यात आला होता. मिर्जापूरला उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळाल्याचे दिसून आले होते. तसेच लोकांनी आपल्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या होत्या.(Bigg Boss 14 Inside House Photos: 'बिग बॉस 14' च्या घरातील फोटो आले समोर; पहा असा आहे आतमधील नजारा)

 

View this post on Instagram

 

mirzapur season 1 free for everyone from sep 25 till 30th! chilla chilla ke sabko yeh scheme bata do🥳

A post shared by amazon prime video IN (@primevideoin) on

प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी पहिल्या सीजनमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, विक्रांत मौसी, श्रिया पिळगावकर, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल आणि कुलभूषण खरबदा हे मुख्य भुमिकेत दिसून आले होते. पंकज त्रिपाठीने मिर्जापुर मधील राजा कालीन भैय्या याची भुमिका स्विकारुन त्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. तर अली फजल आणि विक्रांत मौसीने गुड्डू आणि बबलू पंडितच्या भुमिकेत दिसून आले होते. दुसऱ्या सीझनमध्ये त्यांच्यासोबत विजय वर्मा, प्रियांशु पेन्युली, ईशा तलवार, अमित सियाल, अर्जुन शर्मा झळकणार आहेत. अॅमेझॉन ओरिजनल सीरिज मिर्जापूर 2 चा सीजन येत्या 23 ऑक्टोंबरला जगभरातील 200 हून अधिक देशात आणि प्रदेशात लॉन्च करण्यात येणार आहे.