तान्हाजी: द अनसंग वॉरियर (Photo Credit: Twitter)

अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' (Tanhaji The Unsung Warrior) या चित्रपटाने, बॉक्स ऑफिसवर सलग तीन आठवड्यांपर्यंत धुमाकूळ घातला आहे. 200 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा हा 2020 चा पहिला चित्रपट ठरला आहे. यासह शनिवारी झालेल्या कमाईसह या चित्रपटाने अजय देवगनच्या स्वत: च्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहे. अजय देवगणचा बॉक्स ऑफिसवरचा सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे.

शनिवारी या चित्रपटाने 9.52 कोटी रुपयांची कमाई केले. म्हणजेच 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' चे एकूण उत्पन्न 212.35 रुपये झाले आहे.

अजयच्या 'टोटल धमाल' चित्रपटाने 205 कोटींची कमाई केली होती, आता हा रेकॉर्ड मोडत हा अजयचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' 10 जानेवारी रोजी, दीपिकाच्या 'छपाक' सोबत प्रदर्शित झाला होता. दोन्हीही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कलाकार आहेत, मात्र अजयच्या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत फार मोठी उडी घेतली. 24 जानेवारीला रिलीज झालेला 'स्ट्रीट डांसर 3 डी' आणि 'पंगा' देखील अजयच्या चित्रपटाच्या कमाईवर रोख लावू शकले नाहेत. चित्रपटाला अजूनही या आठवड्याच्या शेवटी चांगला फायदा होत असल्याचे दिसत आहे.

(हेही वाचा: महाराष्ट्रात 'तान्हाजी' चित्रपट टॅक्स फ्री, सरकारची घोषणा)

अजय देवगनचा हा 100 वा चित्रपट आहे, ज्यावर त्याने जवळपास दोन वर्षे काम केले आहे. हा बिग-बजेट चित्रपट बनवण्यासाठी अजय देवगणने घेतलेली मेहनत चित्रपटात स्पष्ट दिसत आहे. आता अजय देवगणने बाहुबली दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा 'आरआरआर' हा पुढचा प्रकल्प सुरू केला आहे. आरआरआर मूव्हीने याबद्दल माहिती देताना ट्विट केले आहे.