बॉलिवूडमधील नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ऐतिहासिक असा बहुप्रतिक्षित सिनेमा तान्हाजी 10 जानेवारीला देशभरात प्रदर्शित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 175 कोटींची कमाई केली असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा तानाजी चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी केली आहे. तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे सुभेदार असून त्यांची 1670 मधील सिंहगडावर केलेल्या कामगिरीचा आदर्श नेहमीच डोळ्यासमोर ठेवला जातो त्यामुळेच हा चित्रपट टॅक्स फ्री असावा अशी मागणी केली होती. त्यानंतर आता हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात आला असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.
तनाजी सिनेमाची कथेसह त्यांची स्टार कास्ट सुद्धा तितकीच तगडी आहे. अजय देवगण, काजोल, सैफ अली खान या तिन्ही कलाकारांनी अगदी उत्तम काम केलं असल्याचं समीक्षकांचं तसेच प्रेक्षकांचं मत आहे. तान्हाजी या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. सिनेमामध्ये 17 व्या शतकात शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये कोंढणा किल्ला पुन्हा जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. त्यांचा हा पराक्रम सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रसिकांसमोर मांडण्यात आला आहे. हा सिनेमा 3 डी माध्यमातूनही रीलीज करण्यात आला आहे.(Tanhaji: The Unsung Warrior चित्रपटासाठी अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खानने घेतले 'इतके' मानधन; वाचून तुम्हालाही बसेल धक्का)
Maharashtra Government makes film 'Tanhaji' tax-free in the state. pic.twitter.com/l3DttfvXJW
— ANI (@ANI) January 22, 2020
या चित्रपटाता तानाजीची मुख्य भुमिका अभिनेता अजय देवगण याने साकारली आहे. तर सावित्री बाई यांची भुमिका काजोल आणि छत्रपती शिवाजी महारांची भुमिका शरद केळकर यांनी साकारली असून त्याला योग्य न्याय देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला आहे.