Mumbai Local Trains: देशात वाढते कोरोना व्हायरसचे संकट पाहता मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन गेल्या 6 महिन्यांपासून अधिक काळ सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. याच कारणास्तव सामान्य नागरिकांना आपल्या ऑफिसला किंवा अन्य कामाजासाठी एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे. बहुतांश लोक रस्ते वाहतूकीने प्रवास करत आहेत. त्यामुळेच हायवेवर सकाळ-संध्याकाळ ट्रॅफिक जाम झाल्याचे दिसून येते. लोकांचा हाच त्रास पाहता अभिनेत्री सौम्या टंडन ( Saumya Tandon) हिने सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे.
टीव्ही शो भाभी जी घर पर है मधील अनिता भाभीची भुमिका साकारलेली सौम्या टंडन हिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करत लिहिले की, बससाठी ऐवढी मोठी लाइन असून लोक 2 तास त्यासाठी उभे राहतात. तसेच बसमध्ये लोकांची गर्दीच सुद्धा तितकिच दिसून येते. आता मॉल्स, रेस्टॉरंट्स सुरु केले आहे तर लोकल ट्रेन सुद्धा सुरु कराव्यात. गरीब आणि सामान्य व्यक्तींना अशा पद्धतीने का त्रास द्यावा? सामान्य व्यक्तीने ऑफिसला कसे जावे? त्यांना उपाशी मरण्यापासून वाचवा आणि कृपया लवकरच लोकल सुरु करावी.(Mumbai Local Updates: मध्य आणि हार्बर मार्गावर आजपासून 22 अधिक लोकल फेऱ्यांची भर; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी Slow Trains ची सोय)
Huge line for bus ppl standing since 2 hours, bus brimming with ppl. When Malls/restaurants/theatres all open why torture the poor/middle class by not opening local trains. How will poor commute for work. Please let’s save them from starving, please start the local @OfficeofUT
— Saumya Tandon (@saumyatandon) October 11, 2020
आपल्या या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला सुद्धा टॅग केले आहे. ट्विटवर लोकांनी सुद्धा तिची साथ देत असे म्हटले आहे की, सौम्या हिने अगदी बरोबर म्हटले आहे, सामान्य जनतेला ट्रेन बंद असल्याने खुप त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात 31 ऑक्टोंबर पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. नुकत्याच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका विधानात असे म्हटले आहे की, नोव्हेंबर महिन्याच्या अखरे पर्यंत अन्य गोष्टींवर बंदी घालत सर्व क्षेत्राली कामे सामान्य रुपात सुरु केली जाणार आहेत,