अभिनेता सोनू सूद याची COVID19 ची चाचणी निगेटिव्ह, चाहत्यांकडून आनंद व्यक्त
Sonu Sood (Photo Credits-Twitter)

कोरोनाच्या काळात लोकांसाठी देवासारखा धावून आलेला अभिनेता सोनू सूद (Sonu Sood)  याची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. याबद्दल सोनू याने स्वत: चाहत्यांना ट्विट करत माहिती दिली आहे. चाहत्यांनी सोनू याच्या या बातमीवर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. सोनू याने एक फोटो शेअर करत स्वत: निगेटिव्ह आल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. याची सुद्धा माहिती त्याने सोशल मीडियात दिली होती. मात्र आता सोनू याची प्रकृती अगदी उत्तम असन लोकांच्या मदतीसाठी तो पुन्हा सक्रिय होणार आहे.(Amit Mistry Passes Away: प्रसिद्ध गुजराती अभिनेता अमित मिस्त्री चे Cardiac Arrest ने निधन)

सोनू याने ट्विट करत त्याचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याचे म्हटले आहे. ज्यावेळी त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली होती तेव्हा त्याने चाहत्यांना सांगितले होते की, आज सकाळी माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे सावधगिरी म्हणून स्वत:ला क्वारंटाइन केले असून मी माझी काळजी घेत आहे. मात्र चिंता करु नका. कारण तुमच्या मदतीसाठी मला वेळ मिळाला आहे. लक्षात ठेवा मी नेहमीच तुमच्यासोबत आहे.(Shravan Rathod यांच्या मुलाचा खुलासा, कोविड 19 पॉझिटिव्ह होण्यापूर्वी आई कुंभमेळ्यात गेल्याची दिली माहिती)

Tweet:

तर सोनू याची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका युजर्सने असे म्हटले आहे की, 'शुभेच्छा सर' तर दुसऱ्याने म्हटले की, 'सुपर भाई'. सोनू सूद याने 2020 मध्ये कोरोनामुळे देशात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात मजूरांची मदत करत सर्वांची मने जिंकली होती. त्यानंतर आता सुद्धा लोकांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे येत आहे.

Tweet:

Tweet:

Tweet:

दरम्यान देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका सर्वांना बसला आहे. त्यामुळे दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. तर गेल्या काही आठवड्यांपासून सुद्धा बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.