बिग बॉस 12 मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची वाईल्ड कार्ड एंन्ट्री
बिग बॉस (Image Credit: Stock Photos)

बिग बॉस 12 च्या पर्वाची सुरुवात झाली असून हा सिझन प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. तसेच या पर्वातील कपल्स जोड्या आणि त्यांची प्रेमप्रकरण यांच्या चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगताना दिसून येतात. सध्या बिग बॉस 12 चा पाचवा आठवडा चालू झाला आहे. तर काही दिवसांपूर्वी एक वाईल्ड कार्ड एंन्ट्रीमध्ये सुरभि राणा ही बिग बॉसच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या वाईल्ड एंन्ट्रीमध्ये या टिव्ही आणि भोजपूरी अभिनेत्रीची पावले पडणार असल्याच्या चर्चा चालू झाल्या आहेत.

एका इंग्रजी प्रसार माध्यमाच्या माहितीनुसार, बिग बॉसच्या घरात भोजपूरी सिनेमाची सुपरस्टार आणि टेलिव्हिजनवर काम करणारी अभिनेत्री रश्मी देसाई दिसून येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. मात्र रश्मी देसाईला बिग बॉसच्या घरात जाण्याच्या बाबतीत विचारले असता, मला बिग बॉसकडून आमंत्रण आले असल्याचे तिने सांगितले आहे. यापूर्वी बिग बॉसच्या या नव्या पर्वात सुरुवातीला रश्मी देसाईची स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली असल्याची बातमी प्रेक्षकांच्या समोर आली होती.

फोटो सौजन्य - गुगल

तसेच रश्मी देसाई हिने हिंदीतील उतरण, नच बलिये या कार्यक्रमात आणि तर ये लम्हे जुदायिके या चित्रपटातून ती झळकली होती.