Asha Bhosale Birthday: आशा भोसले यांंच्या वाढदिवशी लता मंंगेशकर यांंनी 'हा' जुना फोटो शेअर करत दिल्या खास शुभेच्छा, इथे पाहा
Lata Mangeshkar Wishes Happy Birthday To Asha Bhosale (Photo Credits: Instagram)

Happy Birthday Asha Bhosale: भारतीय संगीत क्षेत्राला लाभलेली अनमोल देणगी म्हणुन मंंगेशकर परिवाराकडे पाहिलं जातंं, याच कुटुंंबातील एक बहुमोल हिरा म्हणुन आशा भोसले (Asha Bhosale) यांंच्याकडे पाहिलं जातंं. आज आशा भोसले यांंचा वाढदिवस आहे. 8 सप्टेंबर, 1933 रोजी त्यांंचा सांंगली मध्ये जन्म झाला होता, आज त्या वयाच्या 88 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या खास प्रसंगी आशा भोसले यांंना त्यांंच्या दीदीने खास शुभेच्छा दिल्या आहेत. गानकोकिळा लता मंंगेशकर (Lata Mangeshkar) यांंनी आज आपल्या धाकट्या बहीणीसाठी सोशल मीडियावर एक जुना फोटो पोस्ट करत अगदी सुंंदर आणि साध्या शब्दात शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले आहेत.मंंगेशकर कुटुंबाच्या भावंडांचे प्रेम आणि नात्यातील ओलावा या फोटोमधुन नक्कीच जाणवुन येतोय.

लता मंंगेशकर यांंनी केलेल्या पोस्टमध्ये, "नमस्कार, आज माझ्या लहान बहीणीचा वाढदिवस आहे, आशा भोसले ही स्वतःमध्येच एक श्रेष्ठ गायिका आहे जिचं नाव सगळंं जग जाणतंंय, आज तिच्या वाढदिवशी मी तिला खुप आशिर्वाद देते ती नेहमी अशीच गात आणि सुखात राहो." असा गोड संदेश लिहिला आहे. ज्यावर आशा भोसले यांंनी सुद्धा कमेंट करत धन्यवाद दिदी, आजच्या दिवशी मला फक्त तुमच्या आशिर्वादाचीच गरज होती असे म्हणत रिप्लाय केला आहे.

लता मंंगेशकर Instagram Post

Lata Mangeshkar Wishes Happy Birthday To Asha Bhosale (Photo Credits: Instagram)

दरम्यान, आशा भोसले यांंच्या वाढदिवसाची आणखीन एक खासियत म्हणजे त्यांंचे संगीतातील योगदान पाहता 2002  पासून आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त, चित्रपट संगीतात लक्षणीय कामगिरी करणार्‍या पार्श्वगायकास, अखिल भारतीय नाट्य परिषद (पिंपरी चिंचवड शाखा) आणि काही अन्य संस्थांच्या वतीने ’आशा भोसले पुरस्कार’ दिला जातो. आशा भोसले आणि त्यांंच्या गायकीला आमच्याकडुनही सलाम आणि लेटेस्टली परिवाराकडुन वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!