Angelina Jolie राजकरणात प्रवेश करणार?
अँजेलिना जोली (फोटो सौजन्य-ट्विटर)

संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यामध्ये सातात्याने सहभागी होणारी हॉलिवूड अभिनेत्री अँजोलिना जोली (Anelina Joile) राजकरणात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच समाजसेविका म्हणून सध्या अँजोलिना ओळली जाते.

लैंगिक शोषणाविरुद्ध अन्यायाच्या लढ्यात सक्रीय सहभागी होणारी अँजोलिनाने राजकरणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. याबाबतीत अँजोलिनाने एका मुलाखतीत सांगितले आहे. तर 20 वर्षांपूर्वी अँजोलिनाला राजकरणात सहभागी होणार का असा प्रश्न विचारला असता तर तिने नकार दिला असल्याचे उत्तर बीबीसी टुडेमध्ये दिले आहे. तसेच राजकरणात प्रभाव निर्माण करण्यासाठी सध्या अँजोलिना प्रयत्न करत आहे.

सरकार आणि लष्करासोबत काम करण्यास सक्षम असल्याचे अँजोलिनाने म्हटले आहे. तसेच डेमोक्रेटिक पक्षाकडून राष्ट्राध्यध्य पदाच्या यादीत नाव असणार का असे विचारल्यावर मौन धरले होते. त्यामुळे नक्की अँजोलिना राजकरणात प्रवेश करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.