नरेंद्र मोदी यांची स्तुती करत अमृता फडणवीस यांनी शेअर केला नवा व्हिडिओ; मोदींनी दिले असे उत्तर (Watch Video)
Amruta Fadnavis (Photo credit : youtube)

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या त्यांची वक्तव्ये, गाणं, फॅशन सेन्स यामुळे भलत्याच चर्चेत असतात. अमृता यांच्या गाण्याची आवडही सर्वश्रूत आहे. तसंच सोशल मीडियावरही चांगल्याच अॅक्टीव्ह असलेल्या अमृता फडणवीसांचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अमृता फडणवीस चक्क पौराणिक वाद्य वाजवताना दिसत आहेत. खास संदेशासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना टॅग करत अमृता यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे यावर नरेंद्र मोदींनी देखील व्हिडिओ शेअर रिट्वीट केले आहे.

तुम्हाला जर चांगला नेता व्हायचे असेल तर तुम्ही चांगल्या नेत्याचे अनुनायी असायला हवे, असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींचे शब्द वापरत आपला नवा व्हिडिओ लोकांसमोर आणला आहे. 'डरते तो वो है जो अपनी छवि के लिए मरते है! मैं तो हिंदुस्तान की छवि के लिए मरता हूँ , इसी लिए किसी से भी नहीं डरता हूँ!- आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. यावर उत्तर देताना मोदींनी लिहिले की, Trying my hand at some music in #HunarHaat...

अमृता फडणवीस ट्विट:

अमृता फडणवीस यांनी 'व्हॅलेंटाईन डे'ला त्यांच्या नव्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. 'हॅलो' असं या गाण्याचं नाव असून ते 'लिओनेल रिची' याचं मूळ गाणं आहे. 'हॅलो' या इंग्रजी गाण्यामुळे तसंच व्हॅलेंटाईन डे निमित्त त्यांनी दिलेल्या शुभेच्छा त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.