अमृता फडणवीस यांनी 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त गायले गाणे, नेटीझन्स म्हणाले 'आमच्या कानाचे पडदे फाटले!'
Amruta fadnavis troll (PC - Twitter)

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अर्थात अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचं नवीन इंग्रजी गाणं नुकतंच 'व्हॅलेंटाईन्स डे' (Valentine Day) निमित्त रिलीज करण्यात आलं. या गाण्याचा व्हिडिओ अमृता फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. मात्र, नेहमीप्रमाणे नेटीझन्सनी या गाण्यावरूनही अमृता फडणवीस यांना ट्रोल केलं आहे. यातील एका ट्रोलरने 'गाणं ऐकून आमच्या कानाचे पडदे फाटले!', अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर हे गाणं सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी 'व्हेंलटाईन डे'च्या निमित्ताने हे गाणं रेकॉर्ड केलं आहे. हे गाणं लोकप्रिय इंग्रजी गायक लिओनेल रिची (lionel Richie) यांचं आहे. हेच गाणं अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजात गाऊन 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त रिलीज केलं आहे. (हेही वाचा - Happy Valentines Day: 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी आमिर खानने व्यक्त केली करिना कपूरसोबत रोमान्स करण्याची इच्छा)

या गाण्यावरून नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांची तुलना राणू मंडल यांच्यासोबत केली असून 'हे तर राणू मंडलपेक्षाही भारी आहे,' असं म्हटलं आहे. तसेच काहींनी ‘मला आता हे सहन नाही होतं,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस यांनी हे गाणं पोस्ट करताना हे आपलं आवडतं गाणं असल्याचंही म्हटलं आहे. अमृता फडणवीस यांनी याअगोदरदेखील अनेक गाणी गायली आहेत.