Happy Valentines Day: 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी आमिर खानने व्यक्त केली करिना कपूरसोबत रोमान्स करण्याची इच्छा
Aamir Khan reveals Kareena Kapoor's look in Laal Singh Chaddha (PC- Instagram)

Happy Valentines Day: बॉलिवूड अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) 'व्हॅलेंटाइन डे'चं (Valentines Day) निमित्त साधून 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) या आपला आगामी चित्रपटातील अभिनेत्री करिना कपूरचा (Kareena Kapoor) पहिला लूक शेअर केला आहे. या चित्रपटात करिना मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. आमिर खान आणि करिना कपूर 'तलाश', '3 इडियट्स' या चित्रपटानंतर तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना आमिरने 'करिनासोबत येणाऱ्या प्रत्येक चित्रपटात रोमान्स करण्याची संधी मिळाली तर...,' अशी इच्छा व्यक्त केली आहे. या पोस्टरवर करिना आमिरला मिठी मारताना दिसतं आहे. व्हॅलेंटाईनच्या दिवशी आमिरने अशी इच्छा व्यक्त केल्याने चित्रपटसृष्टीतील अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

आमिर खानने या पोस्टरला 'पा लेने की बेचैनी, और खो देने का डर...बस इतना सा है, ज़िंदगी का सफर', अशी कॅप्शनही दिली आहे. आमिरने या पोस्टरमध्ये 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटातील करिनाचा पहिलाचा लूक शेअर केला आहे. यात आमिरने केवळ 'लाल सिंग चड्ढा'च नाही तर येणाऱ्या अनेक चित्रपटांत करिनासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Angrezi Medium: इरफान खान याच्या 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रेक्षक पुन्हा एकदा पोटधरुन हसणार (Watch Video))

'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गम्प'चा हिंदी रिमेक आहे. 2021 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा मराठमोळ्या अतुल कुलकर्णीने लिहिली आहे. या चित्रपटात आमिर खान एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे. सध्या वेगवेगळ्या देशात या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु आहे.