Angrezi Medium: इरफान खान याच्या 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रेक्षक पुन्हा एकदा पोटधरुन हसणार (Watch Video)
अंग्रेजी मीडियम ट्रेलर (Photo Credits-YouTube)

कॅन्सरच्या आजारावर उपाचार घेऊन पुन्हा चित्रपटात काम करण्यासाठी सज्ज झालेला अभिनेता इरफान खान (Irfan Khan) त्यााचा आगामी चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' (Angrezi Medium) मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत गेल्या काही दिवसांपासूनच चर्चा सुरु झाल्या आहेत. अंग्रेजी मीडियम मधून इरफान याच्यासोबत करिना कपूर, राधिका मदान, दीपक डोबरियाल आणि पंकज त्रिपाठी सुद्धा झळकणार आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण विदेशात ही पार पडले आहे. इरफान खान याला त्याच्या मुलीला शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवायचे असते. पण शिक्षणासाठी लागणारा खर्च पाहूनच त्याचे डोळे पांढरे होतात. मुलीच्या शिक्षणासाठी इमरानकडून करण्यात आलेली धडपड ही यशस्वी होणार का याचा मुद्दा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पहायला मिळणार आहे.

चित्रपटाचा ट्रेलर खुप मजेदार असून प्रेक्षकांना हसवण्यासाठी भाग पाडणारा आहे. इरफान खान आणि दीपक डोबरियाल यांच्या मधील संवाद प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी खिळवून ठेवणारे आहेत. तर पोलीस ऑफिसरची भुमिका साकारत असलेल्या करिना कपूर हिचा अंदाज सुद्धा पाहण्यासारखा आहे. राधिका मदान हिने इरफान याच्या मुलीची भुमिका चित्रपटात साकारली आहे. ट्रेलरमध्ये त्यांच्या बोलण्याचा अंदाज एका वेगळ्याच पद्धतीचा दाखवण्यात आला आहे.

चित्रपट हा प्रेक्षकांना पहायला भाग पाडणारा आहे. यामध्ये हसण्यासोबत नात्यामधील भावना सुद्धा महत्वाची आहे. हा फॅमिली चित्रपट असून सर्वांना आवडेल अशी अपेक्षा केली जात आहे. तसेच इरफान खान याच्या चाहत्यांना त्याचा या चित्रपटातील अंदाज हासायला लावणारा ठरणार आहे. चित्रपटाचे निर्देशन होमी अदजानिया यांनी केले असून येत्या 20 मार्चला तो प्रेक्षकांना सिनेमागृहात पाहता येणार आहे.