रोहित शेट्टीच्या पोलिसी जगात झालीये नवी एन्ट्री; अक्षय कुमार साकारणार ATS प्रमुख 'सूर्यवंशी'ची भूमिका
Akshay Kumar's First Look | (Picture Credit: Instagram)

रोहित शेट्टीने त्याच्या आगामी सूर्यवंशी  (Sooryavanshi)  चित्रपटाचा नायक अक्षय कुमारचा (Akshay Kumar) वर्दीमधला फर्स्ट लुक नुकताच सोशल मीडियावर शेयर केला. त्याच्या पोलिसी जगातल्या पात्रांमधली ही नवी एन्ट्री असणार आहे. या फोटोत रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अजय देवगण (Ajay Devgan) सुद्धा दिसत आहेत. या चित्रपट अक्षय कुमार दहशतवाद विरोधी पथकातील सूर्यवंशी नावाच्या एका अधिकाऱ्याची भूमिका करत आहे.

खरं तर खिलाडी कुमारच्या या भूमिकेची पहिली झलक मागच्या वर्षी आलेल्या सिम्बा  या चित्रपटाच्या शेवटच्या सिनमध्येच बघायला मिळाली होती. तसेच त्या चित्रपटात अजय देवगणच्या सिंघमचाही छोटासा रोल होता. आता सूर्यवंशीमध्ये सिम्बा आणि सिंघम दोघेही पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत असल्याचे म्हटले जात आहे. हॉलिवूडमधल्या 'मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स' प्रमाणेच रोहित शेट्टीचे हे 'पोलिसी जग' प्रेक्षकांना भावते की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

 

या चित्रपटात अक्षय कुमारसोबतच कतरीना कैफही (Katrina Kaif) मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 27 मार्चला प्रदर्शित होईल. तर दुसरीकडे, 25 ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षयचा हाऊसफुल 4 (Housefull 4) हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.