Renuka Shahane Angry Over Extra Electricity Bill (Photo Credits: Twitter)

अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsee Pannu) हिच्या नंतर आता रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांना सुद्धा अवाजवी वीज बिल मिळाल्याचा अनुभव आला आहे. रेणुका यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विट मध्ये या सर्व प्रकरणाचा उलगडा केला आहे. रेणुका शहाणे यांनी ट्विट मध्ये म्हंटले की ‘मे महिन्यात माझे लाईट बिल 5510 रुपये होते. त्यानंतर जून महिन्याच 29, 700 रुपये आले. या महिन्याच्या बिलामध्ये मे आणि जूनचे एकत्र बिल देण्यात आले आहे. तुम्ही मे महिन्याचे बिल 18, 080 रुपये दाखवले आहे… पण माझे बिल 5510 रुपयांवरुन  18, 080 रुपये कसे झाले?’ अचानक बिलामध्ये इतकी वाढ कशी झाली असा प्रश्न करत रेणुका यांनी ट्विटर वर च संताप व्यक्त केला आहे.

अभिनेत्री तापसी पन्नू हिने सुद्धा अलीकडेच आपल्या विजेच्या बिलाचा फोटो ट्विटर वर शेअर करत अवाजवी बीला आकारल्याचा संताप व्यक्त केला होता. यामध्ये तिचे सध्याचे बिल हे नेहमीच्या बिलापेक्षा 10 पटीने अधिक असल्याचे दिसून येत आहे. तापसीला तब्बल 36000 रुपये वीज बिल पाठवण्यात आले होते, आता त्याच पाठोपाठ रेणुका शहाणे यांच्याकडूनही समान तक्रार करण्यात येत आहे.

रेणुका शहाणे ट्विट

दरम्यान, मागील तीन महिन्यात लॉक डाऊन मध्ये वीज मीटरच्या रेकॉर्डिंग्स न घेतल्याने नागरिकांना सरासरी बिल पाठवण्यात येत आहे, यात चूक आढळल्यास तुम्ही सुद्धा तुमच्या वीज पुरवठादारांशी संपर्क करू शकता.