तापसी पन्नू हिने शेअर केला 10 पटीने अधिक आलेल्या विजेच्या बिलाचा फोटो; Adani Power ला टॅग करत विचारले 'हे' प्रश्न
Tapsee Pannu (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री तापसी तन्नू (Taapsee Pannu) हिला आपले विजेचे बिल पाहून झटका लागला आहे. तिने आपल्या विजेच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत अदानी पॉवरला (Adani Power) टॅग केले आहे. यामध्ये तिचे सध्याचे बिल हे नेहमीच्या बिलापेक्षा 10 पटीने अधिक असल्याचे दिसून येत आहे. तापसीला तब्बल 36000 रुपये वीज बिल पाठवण्यात आले आहे. माझ्या घरातील कोणते विजेचे उपकरण इतकी वीज घेत आहे, असा प्रश्नही तिने ट्विटमध्ये विचारला आहे.

तापसीने ट्विटमध्ये लिहिले, "3 महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये मी असे कोणते नवे उपकरण आणले आहे किंवा वापरले आहे की जे इतकी वीज खर्च करतं. आणि त्यामुळे मला इतके मोठे  बिल पाठवण्यात आले आहे."  "तापसीने तुम्ही कोणत्या प्रकारे विजेचे बिल आकारात आहात," असा प्रश्न तापसीने अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबईला टॅग करत विचारला आहे. (अतिरिक्त वीज बिलामुळे मुंबईकरांची झोप उडाली, ग्राहकांनी ट्विटरवर व्यक्त केला संताप; mahadiscom.in वर असे तपासा वीज बिल)

Taapsee Pannu Tweet:

तापसी पन्नू हिने अजून एका बिलाचा फोटो ट्विटरवर टाकला आहे. ते बिल अशा घराचे आहे ज्यात कोणी राहत नाही. तापसीने या ट्विटमध्ये असे म्हटले आहे, "हे अशा घराचे बिल आहे ज्यात कोणी राहत नाही आणि हे घर साफसफाईसाठी आठवड्यातून केवळ एकदा उघडले जाते." तापसीने अदानी इलेक्ट्रिसिटीला टॅग करत असे विचारले आहे की, "आमच्या परवानगीशिवाय यात कोणी राहत तर नाही ना याची मला काळजी वाटते."

तापसीने केलेल्या या ट्विटनंतर अदानी पॉवर कडून अतिरिक्त आलेल्या विजेचे बिल ही समस्या सोडवण्यासाठी एक लिंक पाठवण्यात आली आहे. याचे फोटो तापसीने ट्विटवर अपलोड करत असे म्हटले आहे की, "या तक्रारीबद्दल अदानी इलेक्ट्रिसिटीने खूपच लवकर रिप्लाय दिला. परंतु, लिंक ओपन करण्याची परवानगी नाही दिली."

तापसीच्या या ट्विट्सवर लोकांच्या विविध प्रतिक्रीया येत आहेत. दरम्यान केवळ तापसी पन्नू नाही तर मुंबईकर देखील अतिरिक्त आलेल्या वीज बिलामुळे त्रस्त आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई मधील बहुतांश रहिवाशांनी अतिरिक्त आलेल्या वीज बिलामुळे तक्रार दाखल केली आहे.