जेष्ठ मराठी अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) लवकरच एका मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेत रमेश देव सदानंद कुलकर्णी नाव्याच्या व्यक्तीरेखा साकारणार आहेत. तर सदानंद कुलकर्णी यांचे या मालिकेत एका बिझनेस जगतातील प्रख्यात व्यक्ती अशी ओळख करुन देण्यात आली आहे.
स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील 'छत्रीवाली' (Chatriwali) या मालिकेतून रमेश देव प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. सदानंद कुलकर्णी हे पुण्यातील त्यांची नात निलमसोबत राहतात. तसेच गायकवाड कुटुंबाशी त्यांचे जीवाभावाचे संबंध असून अरुंधती म्हणजेच विक्रमची आई ही त्यांच्यासाठी मुलीप्रमाणे होती. तर अरुंधती यांची निलम हिचे विक्रमशी लग्न व्हावे ही इच्छा होती.या करणामुळेच सदानंद कुलकर्णी हे मालिकेत आपली दमदार एन्ट्री करणार आहेत.
छत्रीवाली या मालिकेत मधुरा विक्रमची लव्हस्टोरी पाहायला मिळाली असून दोघांनी प्रेमासाठी होकार दिला आहे.तर सदानंद कुलकर्णी यांच्या एन्ट्री नंतर या दोघांचे प्रेमसंबंधावर काय परिणाम होतो का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. तसेच विक्रमची आई अरुंधती यांचे स्वप्न पूर्ण होणार की नाही याची चिंता विक्रमला पडली आहे.