'तुझ्यात जीव रंगला..' फेम अभिनेत्री धनश्री कडगांवकरला (Dhanashri Kadgaonkar) हीने काल (28 जानेवारी) सकाळी मुलाला जन्म दिला आहे. रात्री उशिरा धनश्रीने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर करत बाळ आणि ती दोघेही सुखरूप असल्याची पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. दरम्यान गरोदरपणाच्या काळात धनश्री कोविड 19 च्या अनुषंगाने मालिका, शूटिंगपासून दुर राहिली होती मात्र सोशल मीडियात ती अॅक्टिव्ह होती. या काळात तिच्या खास प्रेगन्सी फोटो शूटची चर्चा होती. ती चाहत्यांसोबत लाईव्हच्या माध्यमातून कनेक्टेट राहत गप्पा मारत होती. अपडेट्स शेअर करत होती.
धनश्री कडगांवकर ही 'तुझ्यात जीव रंगला..' या मालिकेत वहिनीसाहेब या पात्रामुळे विशेष गाजली. मात्र कोरोना संकटकाळात शूटिंग थांबलं आणि नंतर गरोदरपणामुळे तिने कामातून ब्रेक घेतला होता. Dhanashri Kadgaonkar Pregnant: अभिनेत्री धनश्री काडगावकरने खास व्हिडिओ द्वारा शेअर केली ‘गुड न्यूज’; लवकरच होणार आई!
धनश्री कडगांवकर पोस्ट
View this post on Instagram
दरम्यान धनश्रीने तिच्या प्रेगन्सीची गोड बातमी देखील एक खास व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली होती. आता न्यू लाईफ, न्यू चाप्टर म्हणत तिने शेअर केलेल्या गोड बातमीवर चाहत्यांकडून कलाकार मंडळींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
बॉलिवूडमध्ये अनुष्का-विराटने काही दिवसांपूर्वी मुलगी झाल्याची गोड बातमी शेअर केली होती. फेब्रुवारीच्या सुरूवातीला करिना कपूर खान देखील तिच्या दुसर्या बाळाला जन्म देणार आहे.