
बॉलिवूडमध्ये परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असणारा आमिर खान (Aamir Khan) त्याच्या विविध कामांमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र सोशल मीडिया स्पॉटलाइटपासून दूर राहणे आमिर पसंद करतो. त्याचप्रमाणे त्याची मुलगी इरा (Ira) सुद्धा लाइमलाइटपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. मात्र सध्या इराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांच्या मनात काही प्रश्न विचारले जात आहेत. तसेच सोशल मीडियात तिचे खुप फोटोसुद्धा व्हायरल झाले असून त्यामध्ये ती आपल्या एका मित्रासोबत नेहमी दिसून येते.
त्यामुळे इरा सोबत नेहमी असणारा हा मित्र कोण आहे. तसेच इरा या मित्राला डेट करतेय असे सुद्धा बोलले जात आहे. तर इराच्या एका चाहत्याने इन्स्टाग्रावर प्रश्न विचारला असून तु रिलेशनशिप मध्ये आहेस का? असे विचारले आहे. त्यावर इरा हिने आपल्या इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये त्या व्यक्तीचा फोटो पोस्ट केला असून त्याला टॅगसुद्धा केले आहे. त्या फोटोत इरा त्याला मिठी मारताना दिसून येत आहे.
या व्यक्तीचे ना मिशाल कृपलानी (Mishal Kirpalani) असे आहे. तर इरा हिने त्याचासोबत फोटो पोस्ट करत सांगितले आहे की मिशाल याला ती डेट करत आहे. मिशाल एक आर्टिस्ट असून तो गाण्याच्या व्हिडिओसाठी काम करतो. इरा आणि मिशा या दोघांनी एकमेकांसोबतचे बरेच फोटो इन्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
(मुलगा आजादच्या पार्टीसाठी आमिर खानचा कार्टून अवतार Photos)
नुकताच इरा हिने तिचा 21 वा वाढदिवस साजरा केला. त्याचे फोटोसुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाले असून आपल्या मित्रमैत्रीणींसोबत पार्टी करताना त्या फोटोंत दिसून येत आहे.