Uber | Representational Image | (Photo Credits: ANI)

ओला-उबरची सध्या मागणी वाढली असल्याने प्रत्येकजण या खासगी वाहनातून प्रवास करणे पसंत करत असल्याचे दिसून आले आहे. उबरने त्यांच्या ग्राहकांना आणि चालकांना एक नवे सेफ्टी फिचरची घोषणा केली आहे. यामध्ये राइड चेक, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि पिन वेरिफिकेशन सारखे फिचर सहभागी आहेत. कंपनीने नवे सेफ्टी फिचर्स त्यांच्या प्राथिमकता आणि सेफ्टी स्टॅन्डर्ड अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने लॉन्च केले आहे. तर जाणुन घ्या कशा पद्धतीने उबरचे हे नवे फिचर काम करणार आहे.

राइड चेक हा नवे फिचर सेफ्टीसाठी काढण्यात आले आहे. ट्रिप दरम्यान अनियमितता ओळखण्यासाठी उबर मदत करणार आहे. यामध्ये लांब आणि अप्रत्याशित थांबे किंवा मिडवे थेंब यासारख्या अनियमिततेचा समावेश आहे. ज्यामुळे सुरक्षा जोखीम वाढवते, विशेषत: महिलांच्या बाबतीत. अशी परिस्थिती उद्भवल्यास, उबर ग्राहक व चालकांपर्यंत पोहोचेल व आवश्यक मदत पुरवणार असल्याचे म्हटले आहे.(Uber च्या प्रवासादरम्यान अडथळे आल्यास प्रवाशाला WhatsApp च्या माध्यमातून करता येणार तक्रार)

ऑडिओ रेकॉर्डिंग हे फिचर या वर्षांत कंपनीकडून लॉन्च करण्यात येणार आहे. हे फिचर आल्यानंतर ग्राहक किंवा ड्रायव्हरकडे ट्रिप दरम्यान फोन मधून ऑडिओ रेकॉर्डिंग करण्याचे ऑप्शन मिळणार आहे. ट्रिप संपल्यानंतर ग्राहकाला सेफ्टी संबंधित घटनेचा रिपोर्ट आणि ऑडिओ रेकॉर्डिंग देण्याचे ऑप्शन असणार आहे. ऑडिओ फाइल एन्क्रिप्ट केली जाणार असून त्यामध्ये युजर्स त्यांच्या डिवाइसव रेकॉर्डिंग ऐकू शकणार नाही आहे. मात्र उबर कस्टमर केअरकडे ती रेकॉर्डिंग पाठवू शकणार आहे. युजरकडून दाखल करण्यात आलेल्या ऑडिओ फाईलची परवानगी उबरकडे असणार आहे. तर पिन वेरिफिकेशन मध्ये कॅब बुकिंग केल्यावर 4 डिजिटचा एक पिन क्रमांक युजर्सला येणार आहे. त्यानुसार ट्रिप सुरु होण्यापूर्वी ड्रायव्हरला दाखवावा लागणार आहे. अॅपमध्ये योग्य पिन क्रमांक टाकल्यानंतरच युजर्सचा पुढचा प्रवास सुरु होणार आहे.